शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 11:27 IST

गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे. ऐन खरिपात नुकसानीचे अनुदान मिळाल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने कपाशीसह, सोयाबीन, तूर इ. पिके चांगली बहरली होती. पिके बहरल्याने उत्पन्नातही भर पडेल अशी आशा शेतक-यांना होती. मात्र जोमात असलेल्या कपाशी पिकावर अचानक शेंद्री बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पडला. वरुन हिरवीगार दिसणारे कपाशीचे बोंड आतून अळीने पोखरुन टाकले होते. यामुळे कापूस काढणीचा खर्च सुध्दा शेतक-यांना परवडेनासा झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. तालुक्यात सरासरी ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. तालुक्यात बोंडअळीने बाधित शेतक-यांच्या कपाशी पिकाची तहसीलच्या पथकाने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. यामुळे तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतकºयांना नुकसान भरपाईस पात्र ठरले. यासाठी शासनाने ८ कोटीचे अनुदान दिले होते. ते आता खात्यावर वर्ग झाले.

टॅग्स :cottonकापूसgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी