शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित केरोसिन आता पॉस मशीनव्दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:06 IST

धान्य पाठोपाठ अनुदानित केरोसिन आता पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गजानन वानखडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : धान्य पाठोपाठ अनुदानित केरोसिन आता पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख लाभार्थ्यांपैकी गॅस कनेक्शन नसलेल्या जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून केरोसिन वितरणासाठी पॉस (पॉइंट आॅफ सेल डिव्हाईस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधारकार्ड जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन मिळणार आहे. दुकानातील ई -पॉस मशिनव्दारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार अ‍ॅथलिकेशन झाले असल्यास केरोसिन मिळणार आहे. ई- पॉस मशिनवर शिधापत्रिकेची माहिती उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका आधार नोंदणी प्रत, शासकीय, छायांकीत ओळखीच्या माध्यमातून केरोसिन उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. ज्या केरोसिन विक्रेत्याकडे ई- पॉस यंत्रणा बसविण्यात आली नाही. अशा विक्रेत्यांनी शिधापत्रिका धारकाकडून आधार क्रमांक केरोसिन विक्रीबाबत पावतीवर लाभार्थ्याचे नाव व शिधापत्रिका क्रमांक नोंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.त्या पावतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी त्याचबरोबर घोषणापत्र देखील केरोसिन विकत घेताना द्यावे लागणार आहे. गॅस जोडणी असल्यास केरोसिन शिधापत्रिकाधारकांना अनुदानित दराने केरोसिन दिल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूर देखील करण्यात आली आहे. बिगर गॅस जोडणी धारकांनाच केरोसिन मिळावे या मागचा हेतू आहे.केरोसिनविक्रेत्यांमध्ये धास्तीशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे केरोसिन विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे विक्रेते आणि ग्राहकांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हमीपत्र द्यावे लागणाररेशनकार्ड धारकांना केरोसिन विकत घ्यायचे आहे. अशा ग्राहकांनी आपल्याकडे गॅस नसल्याचे हमीपत्र रेशन दुकानदारास द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाFuel Hikeइंधन दरवाढ