शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

सोलार प्रकल्पासाठी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:13 AM

निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. निम्न दुधना प्रकल्प धरणाच्या भिंतीवर व कॅनॉलवर सोलार प्रकल्प उभारण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, कार्यकारी अभियंता नितीन बनसोड, महापारेषणचे एस. जी. बागडे, महाजनकोचे व्ही. एस. लोणीकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले, भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात सोलार शिवाय पर्याय राहणार नाही. राज्यात २५० मेगावॅटचे सोलार प्रकल्प उभारण्याचे यापूर्वीच केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून प्रकल्पाच्या किंमतीच्या ३० टक्के निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात शासकीय जमीन उपलब्ध आहे. परंतू शासनाच्या अनेकविध प्रकल्पांसाठी शासकीय जागेची गरज लक्षात घेता सोलार प्रकल्प हा निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीवर, कॅनॉलवर करणे सोईचे राहणार आहे.सोलारमुळे प्रकल्पातील होणारे बाष्पीभवन रोखून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्याचप्रमाणे कालव्याच्या भिंतीवर शेवाळ, बुरशी, कवळ होण्यापासून बचाव होऊन कालवा, भिंतीचे आयुष्य वाढण्यास मदत होण्याबरोबरच पाणीही यामुळे स्वच्छ राहणार आहे. यावेळी राहूल देशपांडे यांनी सौरऊर्जा प्रकल्पाबाबतच्या माहितीचे पॉवर पॉइंटच्या माध्यमातुन सादरीकरण केले. या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरelectricityवीज