शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बारचा परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:27 IST

उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच १५ हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निरीक्षकास अटक

- फकिरा देशमुखभोकरदन : परमिटरूम आणि बारचे नूतनीकरण करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय पवार यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान केली. 

या बाबतीत मिळालेली माहिती अशी की, माहोरा येथील एका बिअरबार व परमिट रूमचे परवाना नूतनीकरण करण्याचे काम प्रलंबित होते. यासाठी भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक संजय महादेव पवार ( ४६ ) याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागास संपर्क केला. 

तक्रारीची पडताळणी करून एसीबीने आज भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सायंकाळी सापळा लावला. ५ वाजेच्या दरम्यान दुय्यम निरीक्षक संजय पवारने तडजोड करून १५ हजार रुपयांची लाच घेतली. याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यास रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पवार यास ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, साईनाथ तोडकर, राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालना