शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:03 IST

दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावी आणि बारावीचे निकाल लागून आता विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि टीसी मिळाली आहे. त्यामुळे आयटीआयसह अभियांत्रिकी आणि अन्य विद्या शाखांमध्ये प्रवेशाची लगीनघाई दिसून येत आहे. दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.एकूणच जालना शहर व जिल्ह्यात सध्या सर्वत्र प्रवेशोत्सव सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, परंपरागत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, अनेकांनी याला पर्याय म्हणून ठेवले असून, अनेकांचा कल हा आयटीआय तसेच अभियांत्रिकीसह औषध निर्माण शास्त्र विभागाकडे आहे. या संदर्भात आयटीआयचे प्राचार्य डी.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आयटीआयमध्ये केवळ ३८८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची क्षमता आहे. परंतु प्रवेश सुरू होऊन तीनच दिवस झाले असले तरी, एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम तारीख आहे. यावेळ पर्यंत किमान तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. हे अर्ज आल्यावर त्याची छाननी होऊन कुठल्या ट्रेडसाठी संबंधित विद्यार्थी पात्र आहे, याचा तपशील गोळा केल्यावर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले.येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीचे नोंदणी केंद्र होते. तेथे अभियांत्रिकीसह फार्मसी अभ्यासक्रमासाठीची नोंदणी करण्यात आली असून, २२ जून पर्यत ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती प्राचार्य बिरदार यांनी दिली.जालना : तंत्रनिकेतनचे यंदा सबकुछ आॅनलाईनशासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा पूर्वीप्रमाणे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जे किट देण्यात येते ते बंद केले आहे. यंदा सर्व प्रवेश हे आॅनलाईन होणार आहेत. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड देण्यात येणार आहे. पासवर्ड दिल्यावर विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठीचे शुल्क देखील आॅनलाईन भरावयाचे आहे. पूर्वी ज्या प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांचे डिमांड ड्राप्ट लागत असत, ते आता बंद केले असून, पेमेंट बँक अथवा डेबीटकार्डच्या माध्यमातून विद्यार्थी शुल्क भरू शकतात. तसेच आता बँकांनी डीडी कॅन्सल करायचा झाल्यास त्याचे चार्जेस भरमसाठ वाढवले आहेत. एक हजार रूपयांचा डीडी. रद्द करायवा झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे जवळपास २६७ रूपये कापले जात आहेत.विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला बायोमेट्रीक हजेरीचा धसकाशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी ही बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खासगी क्लासमध्ये जातांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे फारसे काही हाती लागणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. दहावी तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांना सीईटीमुळे काहीच किंमत नसल्याने महाविद्यालयाच्या हजेरीवर त्याचा परिणाम झाला आहे. बायोमेट्रिकचा निर्णय यापूर्वीही झाला होता, त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय