शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आंदोलनाची धग कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून पेटलेला आंदोलन ाचा वणवा आणखी तीव्र होत आहे. जाफराबादेतर सलग आठ दिवस हे आंदोलन सुरू आहे.रविवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा तसेच अंबड येथे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. रविवारी रात्री अंबड येथे झुंझार छावाचे काही पदाधिकारी येथील पाण्याच्या टाकीवर चढले ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून पेटलेला आंदोलनाचा वणवा आणखी तीव्र होत आहे. जाफराबादेतर सलग आठ दिवस हे आंदोलन सुरू आहे.रविवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा तसेच अंबड येथे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. रविवारी रात्री अंबड येथे झुंझार छावाचे काही पदाधिकारी येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते.जाफराबाद : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यासाठी जाफराबाद तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून एक मराठा लाख मराठा...आरक्षण हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला दरम्यान कायगाव (जि.औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागून तीव्र करण्यात आले. यावेळी मराठा बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त केला असून, जोपर्यत मराठा आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन स्थळी भोजन घेऊन रात्रभर मुक्काम केला जात आहे.केदारखेडा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रवीवारी मुंडण आंदोलन करण्यात आले. सकाळी ८ वाजेपासुन सुरु झालेले मुंडण आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान ३५० पेक्षा आधिक समाज बांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. मराठा आरक्षणसह इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज गेल्या सात दिवसापासून, विविध प्रकारे आंदोलन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केदारखेडा बसस्थानक वर सर्व समाज बांधवांनी एकत्र येत आंदोलन यशस्वी केले. विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वच पक्षाच्या पदधिकाऱ्यानी राजकीय विचार बाजूला ठेवत या आंदोलनात सहभाग घेतला.या आंदोलनात केदारखेडयासह वालसा, डावरगाव, वालसा खालसा, बोरगाव तारु, देऊळगाव ताड, चिंचोली, बानेगाव, तोडोंळी, गव्हाण संगमेश्वर, नळणी, बरंजळा साबळे, बरंजळा लोखंडे, बामखेडा, मेरखेडा आदी गावांच्या मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. येथील नाभिक समाजाच्या १४ बांधवांनी पाठिंबा देत मोलाचे सहकार्य केले आहे.राज्यमंत्री खोतकरांची आदोंलनास भेटकेदारखेडा येथे सुरु असलेले ग्रामिण भागातील मुंडण आदोंलन सुरु असताना या आदोंलनास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या वतीने मी सकल मराठा समाजाच्या पाठीशी असून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन सकल मराठा समाजाच्या आरक्षणा विषयीच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू असे आश्वासन खोतकर यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन