शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:11 IST

शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मचारी संघ तसेच महसूल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मचारी संघ तसेच महसूल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला.तसेच दिवसभर लेखणीबंद आंदोलन करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. अधिकारी, कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली.जालना तालुक्यातील आंतरवाला सिंदखेड येथील रहिवासी शेतकरी दत्तू कळकुंबे हे त्यांच्या शेतीच्या कामानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत, परंतु अनिल चितेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्या दालनात पाठवले. तसेच त्यांच्या सोबत चितेकर हेही आले होते. कळकुंबे हे निवेदन देऊन परतत असताना चितेकर याने कळकुंबे यांना विष घेण्याचा इशारा केला, तसेच मला धक्काबुक्की करून शिविगाळही केली. अनिल चितेकर यांनी कळकुंबे यांना विष घेण्यासाठीचा केलेला इशारा हा सीसीटीव्हीत कैद असल्याचा उल्लेख निवेदन संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यापूर्वी चितेकर यांनी तत्कालीन तहसीलदार जे.एस.पवार यांनाही मारहाण केली होती. असेही निवेदनात नमूद केल आहे. एकूणच चितेकर यांच्यावर कडकारवाई न केल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी ही शासनाची राहील असे म्हटले आहे.जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनावर उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, देवेंद्र कटके, कमलाकर फड यांच्यासह अन्य अधिका-यांच्या स्वाक्षºया असून, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे, राजेश शिंदे, संजय चंदन, संदीब देबडे, विनोद वाघ यांच्यासह अन्य कर्मचाºयांच्या स्वाक्ष-या आहेत. या बंदला काट्राईब, तलाठी तसेच कोतवाल संघटनेनेही पाठिंबा दिला होता.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना