शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दगड उत्खनन,५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:46 IST

दगडवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील दगवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त दगडाची किंमत ३३ लाख रुपये असून, महानगरांमध्ये हा दगड चौपट दराने विकला जातो, अशी माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी दिली.गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री दगडवाडी शिवारातील शिवाजी दामोधर कातुरे व रामेश्वर दामोधर कातुरे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना छापा टाकून आठ टन ३०० किलोग्रॅम मौल्यवान गारीचा दगड जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी कातुरे, रामेश्वर कातुरे, ज्योतिराम बाबासाहेब माने, शरद मच्छिंद्र कदम, गोपीचंद पंढरीनाथ कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मौल्यवान दगड दागिन्यांमध्ये स्टोन, तसेच शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरण्यात येतो, असे पोलीस अधीक्षक पोकळे यांनी सांगितले.व्हॉटसअ‍ॅपवर ठरतो भावऔरंगाबाद, सिल्लोड भागात गारीचा दगडाचा व्यवहार करणारे एजंट सक्रिय आहेत. उत्खनन केलेल्या दगडाचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून गुणवत्ता व दगडाचा प्रकार तपासला जातो. दलालामार्फत भाव ठरल्यानंतर चोरी-छुपे हा दगड रात्रीतून पसार केला जातो. याचे धागेदोरे परराज्यासह परदेशात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस