मंठ्यात पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू
मंठा : मंठा शहरात नगरपंचायतीच्या वतीने पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी नाल्यांची सफाई केली जात आहे. सफाई कर्मचारी शहरातून बाहेर जाणाऱ्या घाण पाण्याला वाट मोकळी करून देत आहेत. शहरात सकाळी आणि सायंकाळी दोन वेळेस स्वच्छता केली जात आहे. मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी हे स्वत: स्वच्छतेवर लक्ष ठेवून आहेत. गटारी स्वच्छ केल्या जात आहेत.
लसीकरण सत्राचे नियोजन करा : सवडे
जालना : लस वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन लसीच्या उपलब्धतेनुसार गावपातळीवर लसीकरण सत्राचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद सीईओ प्रताप सवडे यांनी दिले आहेत. जिल्हा कार्यबल गटाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डाॅ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, संतोष कडले आदींची उपस्थिती होती.