शिवाजी भालशंकर यांचा सत्कार
जालना : जालना शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी भोजाजी भालशंकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते.
मत्स्योदरी महाविद्यालयात जयंती साजरी
जालना : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयात स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे, रासेयो प्रमुख डॉ. विनोद जाधव, क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रशांत तौर, विज्ञान विभागप्रमुख डॉ. डिगांबर भुतेकर, डॉ. रवींद्र पाथरे, डॉ. दत्ता घोगरे, प्रा. संपत पवार, प्रा. दिलीप जाधव, प्रा. कृष्णा परमेश्वर, प्रा. मिलिंद खरात, प्रा. विष्णू दुधे, कार्यालयीन अधीक्षक पांडुरंग गहिरे, सतीष गुजर, बालाजी उगले, कल्याण तारख, सुनील सोनवणे, सुदाम पिंगले, भुजंग राठोड, जनार्दन आढे आदींची उपस्थित होते.
म्युकरमायकोसिसचे नवे पाच रुग्ण
जालना : जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत भर सुरूच आहे. शनिवारी पाच नवीन म्युकमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ११३ रुग्ण आढळून आले आहेत, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९ जणांवर सध्या उपचार सुरू असून, २१ रुग्णांना इतर जिल्ह्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
काळेगावात लसीकरणाला प्रतिसाद
जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून आता ग्रामीण भागात लसीकरणाला वेग येत आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून लसीकरण केंद्रावर अनेकांची मोठी गर्दी होत आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली. या वेळी ११० जणांना ही लस देण्यात आली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थी चमकले
बदनापूर : आंतरशालेय जिल्हास्तरीय १३ ते १६ वर्षे वयोगटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत बदनापूर येथील टि्व्ंकल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकदार कामगिरी करू शकतात, हे दाखवून दिले आहे. सिध्दार्थ संचेती व युमना अन्सारी अशी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर मित्रमंडळ आणि मारवाडी युवा मंचाच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण केंद्र सुरू आहे. या लसीकरण केंद्रास माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. याप्रसंगी उमेश पंचारिया, महेश भक्कड, महावीर जांगिड, संदीप गिंदोडिया, पंडित भुतेकर, कैलास शेजोळ, तुकाराम ब्राम्हणे, छाया वाहुळ, वैशाली निकाळजे आदी उपस्थित होते.
सेतू उपक्रमाबाबत कार्यशाळा
जालना : केंद्रीय प्राथमिक शाळा, सावंगी तलान केंद्रामध्ये सेतू उपक्रमाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात. या कार्यशाळेत केंद्रातील सर्व शाळांचे सहशिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख फय्याज शेख, केंद्रीय मुख्याध्यापक संभाजी उत्स्तुर्गे, लक्ष्मण राठोड, वैशाली पाटील, प्रशांत भुरे, रजनीकांत खिल्लारे, संजय डोईफोडे, मिलिंद मघाडे आदी उपस्थित होते.
तळणी येथे शेती शाळेचे आयोजन
मंठा : तालुक्यातील तळणी येथे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी सहाय्यक ए. जी. साळवे यांनी मका पिकाची शेतीशाळा घेऊन कृषिदिन साजरा केला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी भुते यांच्या मार्गदर्शनाखाली एनएफएसएमअंतर्गत मका पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.