दहिपुरी येथे थाळी बजाव आंदोलन
अंबड : केंद्र सरकारने केलेल्या खत आणि बियाणांसह इंधन दरवाढीविरोधात प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने टाळी व थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दहीपुरी व जामखेड येथील नागरिक सहभागी झाले होते. सरकारने खरिपाच्या तोंडावर केलेली दरवाढ ही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दुसऱ्या डोस बाबत ग्रामस्थांना संभ्रम
वरूड: भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रूक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यावा, याविषयी ग्रामस्थ संभ्रमात आहेत. दरम्यान, आरोग्य विभागही याबाबत ठामपणे सांगण्यास तयार नसल्याने व वारंवार बदल करीत असल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.