शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लाल परी बनली पोलादी ! विभागात ९ बसेस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:41 IST

बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काळानुरूप कोणत्याही वस्तूत बदल होणे गरजेचे आहे. तरच ती वस्तू स्पर्धेत तग धरू शकते. हाच बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली आहे. ८ फेबु्वारीपर्यंत या स्टील बॉडीच्या ९ बसेस जालना विभागात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक यू. बी. वावरे यांनी दिली आहे.खाजगी टॅÑव्हल्सच्या तोडीत- तोड देण्यासाठी व प्रवाशांना प्रवासात सुविधा मिळाव्यात, यासाठी माईल्ड स्टीलच्या बसेसची बांधणी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एस. टी महामंडळाच्या कार्यशाळेत करण्यात येत आहे. या कार्यशाळेतून ८ फेब्रुवारीपर्यंत जालना आगाराला- ५, जाफराबाद- २ व अंबड आगाराला -२ अशा एकूण ९ बस जालना विभागात दाखल झाल्या आहेत. सद्य स्थितीत या विभागात एकूण २५० बस आहेत.खाजगी ट्रॅव्हल्सधारक प्रवाशांना अधिक सुविधा देत आहेत. यामुळे हल्ली प्रवासी दूरच्या प्रवासाला खाजगी ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार अत्याधुनिक सुविधा युक्त असलेल्या स्टील बॉडीच्या बस बनविण्यात येत आहेत. या बसचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांनी याच बसने प्रवास करावा, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.या स्टील बॉडी बसचा लूक लक्झरी व शिवशाहीप्रमाणेच दिसत आहे. यामुळे ही बस दूरवर दिसताच प्रवाशांनी ती शिवशाही, लक्झरी असल्याचा अनेकदा भास होत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बस सुविधायुक्त आहे. तसेच बसचा स्टीलचा पत्रा असल्यामुळे प्रवाशांसाठी या बसचा प्रवास सुरक्षित आहे.प्रवाशांचा बसचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळाने माईल्ड स्टीलचा वापर करून बसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्टील बॉडीच्या बसची बांधणी खाजगी बसला नजरेसमोर ठेवून करण्यात येत असल्याने आरामदायक आसन व्यवस्थेसह इतर सुविधा या बसमध्ये देण्यात येत आहेत.अशी होते बांधणीअ‍ॅल्युमिनीअम बस दुरूस्तीवर आल्यास त्या कार्यशाळेत पाठविल्या जातात. तिथे त्या बसचा झालेला वेग व बॉडीची पाहणी केली जाते. जर बसच्या बॉडीची अवस्था खराब असेल, तर नव्याने ती बस स्टील बॉडीची बनविली जाते.काही दिवसांपूर्वी १० बसेस विभागातून कार्यशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणा-या काळात अजून १० स्टील बॉडीच्या बस नव्याने येऊ शकतात. या सर्वच बस जालना- औरंगाबाद रस्त्यावर विना वाहक सोडण्याचा आमचा विचार सुरू आहे. अशी माहिती जालना आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळtourismपर्यटन