शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

प्रायोजकांची अधिक आवश्यकता उद्योन्मुख काळातच,मात्र मिळतात 'स्टार' झाल्यानंतरच; रुस्तुमे हिंद अमोल बुचडे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 18:08 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १0 वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला उजाळा देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आवश्यक

- जयंत कुलकर्णी

जालना : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला तरच खेळाडूंना प्रायोजक मिळतात; परंतु खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणाऱ्या प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुमे हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने.  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १0 वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला उजाळा देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे अमोल बुचडे यांना वाटते.

अमोल बुचडे याने २0१0 साली पंजाबच्या जरखड येथे रुस्तुमे ए हिंदचा किताब पटकावला होता. तसेच याच वर्षी तो बारामती येथे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त तो येथे आला आहे. या वेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. 

प्रत्येकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्वाची इच्छामहाराष्ट्रातील बरेच पहिलवान महाराष्ट्र केसरी किताब पटकावले की त्यावरच बऱ्याचदा समाधान मानतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याविषयी त्यांच्या मनात विचार येत नाही याविषयी छेडले असता तो म्हणाला ‘‘आर्थिक स्थिती प्रतिकूल असणे, खेळण्यासाठी पोषक वातावरण नसणे आणि कौटुंबिक अडचण अथवा दुखापतीमुळे अनेक मल्लांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर त्याला खेळ थांबवण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे एकदा की महाराष्ट्र केसरी झाला की त्या दर्जाची कामगिरी व्हायला पाहिजे ही मल्लाची इच्छा असते. फक्त महाराष्ट्र केसरी किताबावरच थांबण्याची त्याची स्वत:ची तशी कधीही वैयक्तिक इच्छा नसते. प्रत्येकाचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. आता ट्रेंड बदलत आहे. आता मल्ल फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर समाधान मानत नाही. त्यांचे ध्येय हे तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. मीदेखील महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळलो.’’

उदयोन्मुख खेळाडूंना प्रायोजक मिळावेत खेळाडूंना योग्य वयात स्पॉन्सर्स मिळत नसल्याची खंतही अमोल बुचडे याला वाटते. तो म्हणाला, ‘‘एक दर्जेदार पहिलवान घडवण्याची खूप आर्थिक खर्च असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील पहिलवानांच्या खुराकासाठी किमान १ लाख व राज्य पातळीवरील पहिलवानांसाठी ५0 हजार व सर्वसाधारण पहिलवानांसाठी २५ हजार रुपयांचा खर्च लागतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रायोजकाचे साह्य पहिलवानांना आवश्यक असते; परंतु पहिलवान मोठा झाल्यानंतरच त्याला प्रायोजकत्व मिळते. खऱ्या अर्थाने उद्योन्मुख प्रतिभावान मल्लाच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी व त्यांचे बेसीक पक्के करण्यासाठी प्रायोजकाची गरज असते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्या खेळाडूला प्रायोजकत्व द्यायला हवे. मीदेखील माझ्या अकॅडमीत लहान प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे अमोलने सांगितले.

महाराष्ट्राला मिळेल ऑलम्पिकमध्ये मेडल खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिक मेडल मिळवण्याची धमक गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यात धमक असल्याचेही अमोल बुचडे याने सांगितले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाJalanaजालना