शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म हाच सुखी जीवन जगण्याचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:56 IST

आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे. हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी मंदिरे नव्हती, त्यवेळी घर हे एक मंदिर होते. मात्र कालांतराने स्वार्थ आणि परमार्थात दरी वाढत गेल्याने कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढत गेले. त्यातूनच मंदिरांची निर्मिती झाली. मंदिरात जाताना आपण षडरिपू बाजूला ठेवूनच जाणे अपेक्षित असते, मात्र आपण कुठली ना कुठली इच्छापूर्ती व्हावी म्हणून देव-देव करत असू तर ते अध्यात्म नाही.आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.चेतना ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून रविवारी साळुंके यांच्या विशेष व्याख्यानोच आयोजन केले होते. यावेळी महेंद्रकुमार गुप्ता, सुभाष देविदान, अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. साळुंके यांचा परिचय झंवर यांनी करून दिला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे सांगितले.भगवद् गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे सांगतानाच त्यांनी त्यात जे कौरव आणि पांडवांचे जे युध्द दर्शविले आहे, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ते महाभारताच्या माध्यमातून त्यात आले आहे. श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे याचा अर्थ असा नसून, ती एकट्या अर्जुनाला सांगितली.अर्जुन या शब्दाचा अर्थ च मुळात आत्मसात करणारा असा आहे.एकूणच महाराष्ट्रात संतांनी जो भक्ती मार्ग दाखवला आहे, त्या वाटेवर आपण चालल्यास मिळालेले जीवन सार्थकी लागू शकते.आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवल्या निखळ आनंदी जीवन जगता येते. संसाररूपी रहाटगाडग्यात आपण केव्हा वयस्कर होतो, हे कळत नाही.किमान आता ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपण जबाबदारीतून मुक्त होऊन ईश्वराचे चिंतनात वेळ घालविण्याचे आवाहन साळुंके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हुरगट यांनी केले.

टॅग्स :Familyपरिवारspiritualअध्यात्मिक