शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 15:04 IST

जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक असून येथे कसलाही सूचना फलक नाही.

बदनापूर ( जालना ) - तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील वरुडी शिवारनजीक खाजगी बस आणि ट्रकच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान झाला. खाजगी बसने ट्रकच्या पाठीमागील बाजूवर धडकली असून यात बसचा क्लीनर ठार झाला आहे. 

आज पहाटे एक खाजगी बस (क्रमांक एम एच २९ एएन-७००० ) औरंगाबादकडे जात होती. साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्‍यातील वरुडी शिवारात गतिरोधकाजवळ खाजगी बसने ट्रकला ( क्रमांक एम एच १८ बीजी ८९३५ ) पाठीमागून जोराची धडक दिली. जोरदार धडकेमुळे बसची समोरची बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. यात बसमधील क्लीनर संदीप विष्णुपंत हांडे ( ४५, यवतमाळ ) हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश सत्यनारायण दासर यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खाजगी बस चालक जानरा गणपतराव शिनगारे ( रा. बाणगाव तालुका नेर जिल्हा. यवतमाळ )  याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गतिरोधक सूचना फलक नाहीजालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक आहे. येथे कसल्याची प्रकारचे पांढऱ्या रंगाचे पट्टे, रेडियम सूचनाफलक किंवा गतिरोधकबाबत माहिती नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना