शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस; कृषी विभाग कंपन्यांना कोर्टात खेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 16:46 IST

कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ३६ पैकी २४ नमुने अप्रमाणित उगवण क्षमता ७० टक्क्यापेक्षा कमी२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणी

- दीपक ढोले

जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवले नव्हते. कृषी विभागाने सदर बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले असून, संबंधित कंपन्यांवर कृषी विभागातर्फे कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदा जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून तब्बल २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या. तालुकास्तरीय समितीने पंचनामे करून नमुने घेतले. यात १,८०९ शेतकऱ्यांच्या बियाण्यात त्रुटी आढळून आल्या. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे व नुकसानभरपाई दिली आहे; परंतु १४ कंपन्यांनी नुकसानभरपाई न दिल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

कृषी विभागाने सोयाबीन बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले. बियाण्यात ७० टक्के उगवण क्षमता लागते; परंतु सदरील २४ नमुन्यांत उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने सदरील बियाणे उगवून आले नाही. संबंधित कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणीशेतकऱ्यांनी जूनच्या प्रारंभीच जोरदार पावसामुळे पेरण्या उरकल्या; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. याबाबत जिल्हाभरातून २,७३१ तक्रारी दाखल झाल्या. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उसनवारी करून दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन उगवले नाही. 

केवळ १३ कंपन्यांनी दिली भरपाई जवळपास ४१ कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ १३ कंपन्यांनी ८८ शेतकऱ्यांना बियाणे अथवा पैशाच्या स्वरूपात भरपाई दिली आहे. यात ६१ शेतकऱ्यांना बियाणाची बॅग, तर उर्वरित शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. 

केसेस दाखल करणार जिल्हाभरातून सोयाबीन न उगवल्याच्या २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आम्ही आधीच १४ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बियाणांचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आले आहेत. संबंधित कंपन्यांवर  केसेस दाखल करण्यात येणार आहेत.     - भीमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना

तालुकानिहाय प्राप्त तक्रारीतालुका    प्राप्त तक्रारीजालना     २२३बदनापूर    ४३मंठा    ९०७अंबड    १३३घनसावंगी    ३९६जालना    २७भोकरदन    ५५परतूर    ९४७एकूण    २७३१ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी