शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात

By शिवाजी कदम | Updated: February 7, 2024 19:11 IST

जुने साहित्य खरेदी करून सुरू केला स्वतःचा गूळ उद्योग प्रकल्प

- संतोष सारडाबदनापूर : तालुक्यातील सोमठाणा शिवारात दहा शेतकरी व पदवीधरांनी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसावर प्रक्रिया करून गूळ उद्योगाची उभारणी केली आहे. लवकरच हा गूळ निर्यात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या अनेक युवक शिक्षण घेऊन अनेक विविध प्रकारच्या पदव्या मिळवत आहेत. परंतु, या पदवीधरांना शासकीय नोकऱ्या मिळत नसल्यामुळे अनेक पदवीधर बेरोजगार आहेत. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील पदवीधरांनी एकत्र येऊन गूळ निर्मितीचा व्यवसाय सुरू करून उत्पादित केलेला गूळ जागेवरच यशस्वीपणे विक्री करून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

तालुक्यातील सोमठाणा येथील सचिन धायवर, विशाल नागवे, योगेश नागवे, नारायण मुटकुळे, भूषण कोल्हे, गजेंद्र गायके या शेतकरी कुटुंबातील युवकांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबात ३०-३५ वर्षांपूर्वी असलेल्या गूळ निर्मितीबाबत उद्योग उभारणीचा विचार केला. यानंतर सोमठाणा शिवारातील गट नंबर ४८९ मध्ये शेतकरी गूळ उद्योग समूह याउद्योगाची उभारणी केली. शेतकरी कुटुंबातील या युवकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील वर्षापासून या उद्योगाची सुरुवात केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या या युवकांनी सुरुवातीला प्रत्येकी ५० हजार रुपये भाग भांडवल उभारून या व्यवसायाकरिता कोल्हापूर व अन्य परिसरात गूळ उद्योगाची पाहणी केली. त्यानंतर भाग भांडवल कमी असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून एका गूळ उद्योग कारखान्यातील गूळ निर्मिती करण्यासाठी लागणारे जुने साहित्य खरेदी केले. त्यामध्ये रस काढण्यासाठी मोठा चरक,१८ एचपीचे इंजिन, साचे असे साहित्य आणले.

सेंद्रिय गुळाची निर्मितीऊस तोडणीसाठी सहा कामगार असून या उद्योगात प्रतितास दीड टन क्रशिंग करून रस तयार केला जातो. हा गूळ संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळल्या जात नसल्याचे या उद्योगाचे चेअरमन बाबुराव नागवे यांनी सांगितले. मागील वर्षी येथे २०० टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी ७०० टन ऊस गाळप करण्याचा प्रयत्न आहे. या उसाच्या रसावर प्रक्रिया करून दीड किलो एक किलो पाच किलो अशा वजनाच्या गुळाच्या भेल्या तयार केल्या जातात. डिगांबर नागवे हे ज्येष्ठ शेतकरी आपल्या गूळ बनविण्याच्या अनुभवावरून आज येथे गूळ बनवितात.

कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाहीअडीच लाखांच्या भाग भांडवलावर गूळ निर्मिती सुरू केली आहे. आगामी काळात येथे यंत्रसामग्री वाढविण्यात येईल. उद्योग उभारणीसाठी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. या उद्योगांमध्ये विविध प्रकारचे पदवीधर आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. आमच्या उद्योगाला नुकतेच दुबई येथील काही लोकांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आम्ही उत्पादित केलेला गूळ निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहोत.- विशाल नागवे, संचालक, समर्थ गूळ उद्योग.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीJalanaजालना