शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

By शिवाजी कदम | Updated: February 20, 2024 19:30 IST

सरकारने फसवलं, सगेसोयऱ्याच्या कायद्याला बगल दिल्याने पुन्हा आंदोलनाची दिशा ठरणार: मनोज जरांगे

वडीगोद्री : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, आज अधिवेशनात घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. सरकारने सगेसोयऱ्यांच्या कायद्याला बगल देऊन १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल सरकारने उचलले आहे, हे आम्हाला मान्य नाही. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी आयोजित बैठकीत सांगितले. तसेच सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही, असा गंभीर आरोप देखील जरांगे यांनी यावेळी केला.

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, आम्हाला टिकेल की नाही या लफड्यात पडायचं नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे. आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. उगाच समाजाचा अपमान करायचा हे योग्य नाही. सरकारने विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. यासाठी आक्रोश करतोय त्या माता-माउलींची चेष्टा सरकार करत आहे. आम्ही आधीही स्वागत केले होते. आताही स्वागत करतो; पण आमच्या हक्काचे आरक्षण द्या, यापूर्वीही सांगितले होते. ते नाकारण्याचे काही कारणच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

घाईगडबड नाहीच आहे. हरकती तपासण्यासाठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आम्ही संयमी आहोत. उद्या आमचा निर्णय ठरल्यावर त्यांना आमची भावना कळेल. आम्हाला आज हा दिवस बघायला लावला. अंमलबजावणी पाहिजे. हा हट्टीपणा नाहीये अधिकार आहे. सरकारने केलेल्या कायद्यामुळे पोरांचे काही कल्याण होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर इतके दिवस आंदोलन चाललेच नसते. मी लेकरांचे वाटोळे नाही करू शकत. त्यांना मर्यादा आहे तशाच आम्हालाही आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारशी आमची वैयक्तिक काही वैर नाहीये, आंदोलनाची दिशा ठरली की, सगळे उडवणार आहेत. सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी लावला आहे.

उपचार नाकारलेमनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सलाइन काढून घ्या असे म्हणत हाताला टाकलेली सलाइन स्वतः काढण्याचा प्रयत्न केला. आता सरकारचे उपचार बंद, असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना