शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

काही मागण्या पूर्ण काही बाकी, ओबीसी आरक्षण बचाव उपोषण तूर्तास स्थगितिची हाकेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:59 IST

आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची पूर्तता होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत.

वडीगोद्री: आज दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.

आज दुपारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळ दाखल झाले. शिष्टमंडळाची विमानतळावरच काही वेळ बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यातील उपोषणस्थळ वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजेला शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत शिष्टमंडळाने सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली, तसे पत्र दिले. त्यानंतर हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी हाके म्हणाले, आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची पूर्तता होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत. यापुढे हे आंदोलन सुरूच राहील. विक्रमी वेळेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासनाने बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि ते देणारे या दोघांवर कारवाई करण्यात येईल असे शासनाने सांगितले आहे. पुढचा लढा पंचायतराज मधील ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा आहे, असेही हाके यांनी जाहीर केले. 

शासनाच्या शिष्टमंडळात कोण होतेराज्य शासनातील मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. तर गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. यावेळी उपोषणस्थळी ओबीसी बांधवांची मोठी गर्दी झाली आहे.

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, काय घडले १० दिवसांत सर्व मराठा कुणबी आहेत. त्यांना तसे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी सगेसोयरेचा आदेश शासनाने काढावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मात्र, सरसकट मराठा ओबीसीमध्ये आल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन उभारून लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे यांच्यासह वडीगोद्री येथे उपोषणाला बसले. शुक्रवारी, उपोषणाच्या ९ व्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळत चालली असताना सरकारी यंत्रणा सक्रिय झाली. ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हाके यांनी केलेल्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या. आज दुपारी याबाबतचे पत्र घेऊन सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. सरकारचे मागणी मान्य झालेले पत्र आणि इतर मागण्यांवरचे आश्वासन ग्राह्य धरून हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मात्र, लढा आणखी सुरूच राहिले असेही हाके या वेळी म्हणाले.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाChhagan Bhujbalछगन भुजबळlaxman hakeलक्ष्मण हाके