शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:47 IST

अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. अशा सायकलींच्या वापरामुळे पेट्रोल वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करता येणार आहे.अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्युत विभागात शिकणा-या अशोक कोटंबे, अभिषेक लांडे, शांभवी जपे, आकांक्षा काठमांडे, दिप्ती चावरे या पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक डी. एस. बनसोड यांनी मार्गदर्शन केले. सौर ऊर्जेवर चालणारी सायकल या त्यांच्या प्रयोगाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतेची ओळख निर्माण करून दिली आहे. सौर ऊर्जेवर एक तासात ३० किलोमीटर अंतर या सायकलने गाठता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायंडल मारूनही सायकल चालविता येऊ शकते. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सोलर संच, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटर आदी साहित्यांचा वापर केला असून, जवळपास २० हजार रूपये खर्च आला आहे. या सायकलीला समोर लाईट, हॉर्न आणि इलेक्ट्रिक ब्रेक्स आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासातही या सायकलाचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही सायकल तालुक्यातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरत असून, या सायकलवर विद्यार्थी अंबड ते अंतरवाली सराटी हा प्रवास करीत नागरिकांना माहिती दिली आहे.अशोक आणि त्यांच्या मित्रांचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना पुढील उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. मात्र, घरात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यातच शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, मुलांनी तयार केलेली सायकल पाहून त्यांंना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अशोक कोटंबेच्या पालकांनी सांगितले.सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मुलांनी आपल्या संकल्पनेतून सौर ऊर्जेवर चालविणारी सायकल तयार केली आहे. या मुलांच्या कर्तृत्वाला चालना मिळण्यासाठी शासनाने विविध योजनांद्वारे आर्थिक मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज