शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

...मग आपले गाव का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:47 IST

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाने ३० वर्षे सातत्य आणि प्रचंड मेहनत करून गावाचा कायपालट केला आहे. या गावासारखे इतर गावे का होऊ शकत नाही, हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. गावातील वाद, गटतट विसरुन प्रबळ इच्छशक्ती आणि लोकसहभागातून गावाचा विकास साधणे गरजेचे आहे, असे मत सनदी अधिकारी आणि हगणदारी मुक्त अभियानात मोलाचे योगदान देणारे निपुण विनायक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

ठळक मुद्दे निपुण विनायक : जिल्ह्यातील सरपंचांना पत्राद्वारे आवाहन

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाने ३० वर्षे सातत्य आणि प्रचंड मेहनत करून गावाचा कायपालट केला आहे. या गावासारखे इतर गावे का होऊ शकत नाही, हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. गावातील वाद, गटतट विसरुन प्रबळ इच्छशक्ती आणि लोकसहभागातून गावाचा विकास साधणे गरजेचे आहे, असे मत सनदी अधिकारी आणि हगणदारी मुक्त अभियानात मोलाचे योगदान देणारे निपुण विनायक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.ठराविक काळानंतर शासनाच्या धोरणानुसार सनदी अधिका-यांना शिक्षणासाठी परदेशात पाठविले जाते. पण निपुण विनायक यांनी परदेशात न जाता मराठवाड्यातील काही गावांचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्यानुसार ते सध्या जालना जिल्हा दौयावर आहेत. विनायक यांनी शनिवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. गावाचा शाश्वत विकास, बालविवाह, मुलींचे शिक्षण, आरोग्य या प्रश्नांचा ते अभ्यास करीत आहेत. विनायक यांनी नवी दिल्लीत केंद्र शासनाच्या कॅबिनेट सेक्रेटरी या पदावर पाच वर्षे काम केले आहे. गाव हगणदारी मुक्त करण्याच्या त्यांच्या संकल्पनेतील अनेक मुद्दे पंतप्रधान कार्यालयाने यंदाच्या बजेटमध्ये समाविष्ट केले आहेत. उघड्यावरील शौचमुक्त वातावरण (ओडीएफ) ही संकल्पना त्यांनीच आणली. २००५ साली जिल्हा परिषदेत सीईओ पदावर कार्यरत असताना त्यांच्या निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेतली होती. याच काळात निर्मलग्राम अभियानात जिल्ह्याने अनेक पुरस्कार मिळवले. विनायक म्हणाले, जालना जिल्ह्यात आपण काम केलेले आहे. येथून खूप बाबी शिकायला मिळाल्या. म्हणून या जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा शाश्वत विकास व्हावा, असे मनापासून वाटते. या उद्देशानेच जिल्ह्यातील सर्व सरपंचांना गावाच्या विकासाबाबत पत्र पाठवले आहे. यासाठी हिवरे बाजारचे सोदाहरण देऊन ते गाव होऊ शकते मग आपले गाव का नाही, अशी भावनिक साद त्यांना घातली आहे. जेणेकरुन यातून सरपंचांना प्रोत्साहन आणि पे्ररणा मिळून विकासासाठी संपूर्ण गावच झपाटून उठेल.मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सध्या ग्रामीण भागात गंभीर बनला आहे. गावात शाळा असेल तोपर्यंत मुलींचे शिक्षण होते. त्यानंतर कमी वयातच त्यांचा विवाह लावला जातो. कमी वयातच त्यांच्यावर मातृत्व लादले जाते. मातेचा परिपूर्ण विकास झालेला नसतो, त्यातच अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या अपत्याचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास कसा होईल, असा सवाल त्यांनी केला. म्हणूनच मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे. यासाठी माता पित्यांना समुदेशन करण्याची गरज असून, मुलींबाबत ओझे असा विचार न करता त्यांच्या विकासासाठी सकारात्मक बाबी त्यांना पटवून द्याव्या लागतील. नेमके हेच सरपंच आणि त्या त्या गावातील लोकांनी करणे आपल्याला अपेक्षित आहे. यासाठी आपण लोकांमध्ये मिसळून काम करत आहोत. अनेक गावांना भेटी देत आहोत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत आहोत.नगर जिल्ह्यातील छोट्याशा हिवरे बाजार या गावाने विकासाबाबत राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला आहे. आजरोजी दररोज किमान ५०० लोक या गावाचा विकास पाहण्यासाठी या गावाला भेट देतात. कोण काय करतो ? कोण काय करेल ? बाहेरून काय मदत मिळेल ? या विचारापेक्षा ‘मी काय करेन’ ? या विचारापासून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सुरु वात केली. सर्वात अगोदर लोकांना एकत्र आणले आणि ‘मी’ हा विचार सोडून ‘आम्ही’ हा विचार रूजवला. मग एक-एक करून सर्व गावकरी मिळून गावाचे प्रश्न हाताळू लागले. गावात वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. बाहेरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याच गावातील लोकांना सोबत घेऊन संस्था स्थापन केल्या. संस्थेने काम करायचे आणि पूर्ण हिशेब ग्रामसभेसमोर मांडायचा. सरपंच स्वत: पैशाच्या व्यवहारामध्ये पडले नाहीत. पाण्याचा ताळेबंद ग्रामपंचायतीने करायचा. ग्रामपंचायत आणि संस्थेचा समन्वय ग्रामसभेमार्फत ठेवायचा, जी निर्णय घेणारी सर्वात सशक्त यंत्रणा व्हायची. गावातील पारदर्शकता, संघटन आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यामुळेच तीस वर्षांनंतरही गावातील शाश्वत विकास हा टिकून आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे, असे विनायक म्हणाले.स्थानिक नेतृत्व विकसित व्हावेच्गावातील सत्तेचे विकेंद्रीकरण आणि पारदर्शी कारभारामुळे लोक एकमेकांशी जोडले जातात. मी ऐवजी आम्ही हा प्रयोग केल्यास लोकसहभाग वाढतो. त्यातूनच स्थानिक नेतृत्व विकसित होत असते. मतभेद, गटतट या बाबी दूर करुन स्थानिक नेतृत्व विकसित व्हावे, असे विनायक म्हणाले.च्राज्यात २७ हजार ग्रामपंचायती आणि १ लाख खेडी आहेत. शासनाच्या योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा लोकांनी स्वयंस्फूर्तीने गावांच्या शाश्वत विकासाची चळवळ झाली तर संपूर्ण राज्याचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही.विकसनशील गावांचा आदर्श घेण्याची गरजमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पाटोदा, बिहरगाव, जालना जिल्ह्यात शिवणी, नासडगाव, गोविंदपूर, आंबडगाव, दावलवाडी, जाळीचा देव, आलापूर, कुक्कडगाव, तांदुळवाडी, मेसखेडा, ठेंगेवडगाव, आसनगाव ब्रम्हवडगाव, कडेगाव, मालखेडा, दुधा, गणेशपूर, बुलडाणा जिल्ह्यात वकाना आदी गावांनी विकासाचा पॅटर्न निर्माण केला आहे. तसा इतर गावांनी करण्याची गरज आहे.