शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जालन्यात लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:14 IST

जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगुरांचा पाणी प्रश्न गंभीर : अनेक गावांची तहान भागवणे झाले अवघड, टँकर भरण्यासाठी विहिरींचाच आधार

जालना : जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. फ्रेबु्रवारीच्या मध्यातच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने गुरांसह माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जालना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात आज घडीला १.२६ तर ५७ लघु प्रकल्पात सध्या केवळ १.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे असून, ३ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी ही जोत्याच्या पातळीखाली आहे. लघु प्रकल्पांचा विचार केल्यास त्यातील ३७ तलाव हे कोरडे पडले आहेत. १४ तलावांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून खूपच कमी पाणी शिल्लक असल्याने शेतकरी आणि विशेष करून पशुपालक भयभीत झाले आहेत.जालना जिल्ह्यात यंदा केवळ ६१ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांसह पाण्याच्या साठवणूकीवर झाला आहे. विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने अनेक शेतकरी उभे-आडवे बोअर त्यात घेऊन जास्तीत जास्त भूगर्भातील पाणीसाठा कसा वापरता येईल याकडे वळले आहेत. अनेक गावांमध्ये हातपंप घेण्यासाठी गाड्या जात आहेत. मात्र ३०० ते ४०० फूट खोलवर जाऊनही पक्के पाणी लागत नसल्याचे दिसून आले. एकूणच जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची अवस्था पुढील काही महिन्यांत आणखी गंभीर होणार आहे.बाष्पीभवनाचाही परिणामजालना जिल्ह्यात पाऊस कमी पडला हे वास्तव आहे. परंतु मध्यंतरी कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने देखील तलावातील पाणीपातळी घटल्याचे सांगण्यात आले. त्यातच मध्यंतरी अनेक शेतकºयांनी आहे, त्या पाण्यातून विद्युत मोटीरींच्या मदतीने पाणीचोरी केल्याचे प्रकारही सर्रासपणे घडले. आता तर हे सर्व प्रकल्प कोरडे पडल्याने गुरांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनला आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई