शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साठ वर्षात कर्ज बुडव्यांना देशाबाहेर जाऊ दिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:58 IST

काँग्रेसने साठ वर्षात शत्रू देशांना धडा शिकवण्याबरोबरच एकाही कर्ज बुडव्याला देश सोडून जाऊ दिले नसल्याची घणाघती टीका खा. राजीव सातव यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर/ वाटूर : काँग्रेसने साठ वर्षात शत्रू देशांना धडा शिकवण्याबरोबरच एकाही कर्ज बुडव्याला देश सोडून जाऊ दिले नसल्याची घणाघती टीका खा. राजीव सातव यांनी केली. वाटूर फाटा येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त काँग्रेस पक्षाकडून विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून खा. राजीव सातव हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोराडे, माजी खा. तुकाराम रेंगे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंटयाल, माजी आ. धोंडीराम राठोड, राजाभाऊ देशमुख, प्रा. सत्संग मुढे, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे उपस्थित होते.यावेळी खा. सातव म्हणाले की, भाजपा सरकारमधील नेते नेहमी आपल्या भाषणात एकच विचारतात, काँग्रेसने साठ वर्षात काय केले? परंतु आम्ही तुमच्यासारखे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे कोट्यवधींच्या कर्ज बुड्यांना देश सोडून जाऊ दिले नाही. तसेच बँकांची कधीच एवढी दुरवस्था होऊ दिली नाही. नोटाबंदी करून यांच्याच नेत्यांनी व बॅकांनी घोटाळे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलवले. आमचे मनमोहन सिंग दहा वर्षे या देशाचे पंतप्रधान राहिले पण त्यांनी पाकिस्तानात पाय ठेवला नाही. स्व. इंदिरा गांधीनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या सरकारने छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मोडीत काढले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे आहेत. परंतु येथे शेतकऱ्यांना कर्जमाफीचाही लाभ मिळत नाही, पीकविमा नाही, बँका शेतक-यांना दारात उभे करायला तयार नाहीत. शेतकºयांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही. या मतदार संघात सत्ताधारी स्वत:चे घर भरण्याचे काम करीत असल्याचेही सातव यांनी सांगितले. यावेळी मा. आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, काँग्रेसची ताकद वाढत आहे. सत्ताधारी मनमानीपणे कारभार करीत आहेत. शेतकरी, सर्वसामान्य माणूस आज त्रस्त आहे. सर्वानी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती