शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सहा सिंचन प्रकल्पांना मिळणार ७७५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:11 IST

वर्षभरापूर्वी पाठविलेल्या जालना जिल्ह्यातील सहा लघु सिंचन प्रकल्पांना आता पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत ७७५ कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने जालन्यासाठी हा एक प्रकारचा जॅकपॉटच म्हणावा लागेल.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वी पाठविलेल्या जालना जिल्ह्यातील सहा लघु सिंचन प्रकल्पांना आता पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत ७७५ कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने जालन्यासाठी हा एक प्रकारचा जॅकपॉटच म्हणावा लागेल.जालना जिल्ह्यातील सहा लघुप्रकल्पांना मंजुरी मिळावी म्हणून येथील लघु पाटबंधारे विभागाने सहा सिंचन प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावर बरीच चर्चा होऊन त्याला आता निधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.वर्षभरापूर्वी लघु पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयाने पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले होते. या संदर्भात नुकतीच दिल्ली येथे बैठक होऊन विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील ८३ लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात केंद्र सरकारचे अर्थसहाय्य मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदीविकास योजनेतून या प्रकल्पांना निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.या सहा प्रकल्पांचा समावेशभोकरदन तालुक्यातील पळसखेडा प्रकल्पासाठी १७२८.८६ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. यातून ७.८३ द.ल.घ.मि. एवढे पाणी या प्रकल्पामध्ये साठविता येणार असून, त्यातून ५७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मंठा तालुक्यातील पाटोदा येथील प्रकल्पासाठी ८४.७५ लाख रुपये मिळणार असून, यातून ८.६०७ द.ल.घ.मी. साठवण क्षमता निर्माण होणार असून, जवळपास ११०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. खोराड सावंगी या प्रकल्पासाठी १५१८.२१ लाख रुपये मिळणार असून, यातून २.५५ द.ल.घ.मी. पाणासाठा निर्माण होईल. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून २५४ हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. जालना तालुक्यातील हातवन लघू प्रकल्प पूर्णत्वासाठी ३७३१७.१७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, यामध्ये १५.०३ द.ल.घी. साठवण क्षमता निर्माण होईल. या माध्यमातून परिसरातील जवळपास १६७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील बरबडा प्रकल्पासाठी १९७७६.८५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, या माध्यमातून ११.६ द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. यातून १२२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. जाफराबाद तालुक्यातील सोमखेडा येथील प्रकल्पासाठी ३८४९ कोटी रुपये अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ३.६२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होईल, त्यातून ४४५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfundsनिधी