त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, बुधवारी जालन्यातील रेशीम बाजारपेठेत थेट शंभर क्विंटल आवक झाली असून, विक्रमी भाव म्हणजे प्रतिक्विंटल ४५ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकऱ्याला आज मोठे समाधान वाटल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी घेतला पुढाकार
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी त्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोश विक्रीसाठी थेट कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ओढाताणीसह तेथे चांगले दर न मिळाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आपण मंत्री असताना जालन्यातील बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिली रेशीम कोश खरेदीची बाजारपेठ सुरू केली. आज रेशीम कोशाला जो विक्रमी भाव मिळाला आहे, त्यामुळे आमच्या उपक्रमाचे चीज झाले आहे.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री तथा सभापती बाजार समिती, जालना
चौकट
२६ कोटींची उलाढाल
जालन्यातील या रेशीम कोश खरेदी बाजारपेठेत गेल्या तीन वर्षात जवळपास बारा हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम कोशाची विक्री केली. त्यातून या बाजारपेठेतील ही उलाढाल जवळपास २६ कोटी २४ लाख रुपयांवर झाली असल्याची माहिती जालना कृषी बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिली.