शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:41 IST

भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते.

जालना : भाटेपुरी येथील शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्यामुळे दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना जालना तालुक्यातील रामनगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पोटात गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विलास मोरे यांनी दिली. याप्रकरणी परस्परविरोधी तब्बल ६१ जणांवर रात्री उशिरा मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. यातूनच शिवाजी शेजूळ व रमेश यज्ञेकर यांच्यात बुधवारी सायंकाळी वादावादी झाली. त्यानंतर रमेश यज्ञेकर यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. एकमेकांवर दगडफेकदेखील करण्यात आली. रमेश यज्ञेकर यांनी स्वत:जवळची रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार गेला. विजय ठेंगळे यांच्या पोटाला गोळी लागली. पोलिसांनी त्यांना तात्काळ जालना येथे उपचारासाठी पाठविले. ठेंगळे यांना तपासून औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, दोन्ही गटांनी पोलिसांवरही दगडफेक केली असून, यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू माेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विलास मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जमावाला शांत केले, अशी माहिती सपोनि विलास मोरे यांनी दिली.

२० जणांना केली अटकघटना घडल्यानंतर पोलिसांनी जवळपास २० जणांना अटक केली आहे. एका गटातील ११ तर दुसऱ्यातील ९ जणांचा यात समावेश आहे. यापूर्वीही या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली होती.

पाच गोळ्यांच्या फैरी झाडल्याया वादातून झालेल्या गोळीबारात रमेश यज्ञेकर यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून पाच गोळ्यांच्या फैरी झाडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वादामुळे गुरुवारी रामनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. भांडण झालेल्या परिसरात पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, पोलिसांसमोर हा गोळीबार झाला. त्यात नंतर पोलिसांनी ती रिव्हॉल्व्हर जप्त केली.

गोळीबार प्रकरणी ६१ जणांवर गुन्हे दाखलया प्रकरणी रात्री उशिरा परस्परविरोधी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. रमेश यज्ञेकर यांच्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी शेजुळ, मुरलीधर शेजुळ, उत्तम शेजुळ, श्रीराम शेजुळ, राम शेजुळ, पांडुरंग शेजुळ, तुकाराम शेजुळ, कृष्णा शेजुळ, शाम शेजुळ, अशिष शेजुळ, मनोज शेजूळ, कृष्णा शेजुळ, अर्जुन शेजुळ, नारायण शेजुळ, प्रभाकर शेजुळ यांच्यासह ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर शिवाजी शेजुळ यांच्या फिर्यादीवरून संशयित रमेश यज्ञेकर, गजानन यज्ञेकर, श्रीराम यज्ञेकर, मनोहर यज्ञेकर, मनोहर पोटे, कृष्णा झुंगे, गेंदालाल झुंगे, अरूण यज्ञेकर, अशोक झुंगे, गोविंद झुंगे, अरूण गुऱ्हाळकर, अनिल जोशी, राजाराम झुंगे, मच्छिंद्र पवार यांच्यासह २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना