शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:25 IST

वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे.

जालना : अनैतिक संबंध, मालमत्ता,‎ कौटुंबिक कलह, शेती, आर्थिक‎ व्यवहार अशा विविध प्रकारांतील‎ वाद विकोपाला गेल्यामुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात तब्बल ८ खून झाले आहेत. त्यापैकी सर्व खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही खुनांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. एकाच महिन्यांत आठ खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे. जालना पोलीस दलाकडून गुन्हे नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाया केल्या जात आहेत.

मार्च महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच पाहायला मिळाली. एकापाठोपाठ तब्बल सात खून १५ दिवसांत झालेत. त्यानंतर एक खून झाला आहे. एक महिला व सात पुरुषांचे खून झाले आहेत.

तीन महिन्यांत १६ खूनगेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात १६ खून झाले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत केवळ ८ खून झाले होते, तर एकट्या मार्च महिन्यात ८ खून झाले आहेत.

अशा घडल्या खुनाच्या घटना१) वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून जालना तालुक्यातील मोहाडी छबू घासू राठोड (५३) यांचा पुतण्यानेच खून केला होता.२) भांडणातून मित्रानेच भगवान राजू तळेकर (२३) या चालकाचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी पाटीजवळ घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे घडली होती.४) अंबड शहरातील रामेश्वर अंकुश खरात (२०) या तरूणाचा खून करण्यात आला.५) जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बैल चोरीच्या संशयावरून शेजाऱ्यानेच सोमीनाथ श्यामराव जाधव ( ४३) यांचा खून केला होता.६) शेजारी राहणाऱ्या महिलेने साथीदारासह जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील महिला सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा खून केला होता.७) जालना तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी राजकुमार भास्कर साळवे (३२) यांचा खून करण्यात आला होता.८) आर्थिक देवाण-घेवाणीवरून फुलंब्री येथील राजेश मुरलीधर जाधव (४२) यांचा खून करून मृतदेह परतूर तालुक्यातील मांडवा परिसरात आणून टाकला होता. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना