शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धक्कादायक! चटके दिलेल्या घटनेपूर्वी कैलास बोराडे मंदिरात मद्यपान करून फिरत होते अर्धनग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:39 IST

या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

भोकरदन (जि. जालना) : गरम रॉडने चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या कैलास बोराडे यांचा घटनेपूर्वीचा एक व्हिडीओ ६ मार्च रोजी रात्री समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास बोराडे हे मद्यपान करून अर्धनग्न अवस्थेत महादेव मंदिराच्या आवारात फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी रात्री कैलास बोराडे यांना लोखंडी रॉडने चटके देऊन गंभीर जखमी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बोराडे यांच्या तक्रारीवरून नवनाथ दौड व भागवत दौड या भावंडांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र या घटनेच्या दिवशी नेमका काय प्रकार झाला व कशामुळे झाला याचे व्हिडीओ आता बाहेर येत आहेत.

असाच एक व्हिडीओ ६ मार्च रोजी रात्री व्हायरल झाला आहे. त्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान अनेक भाविक या मंदिरांवर दर्शनासाठी आलेले होते. त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी कैलास बोराडे हे अर्धनग्न अवस्थेत मद्यपान करून मंदिरात जात होते त्यामुळे महिला शरमेने या ठिकाणाहून बाहेर जात होत्या. बोराडे यांना तू मंदिरात जाऊ नको, असे अनेकांनी सांगितले. मात्र, माझ्या अंगात महादेव संचारला आहे. तुम्ही मला कसे थांबवता. म्हणून त्याने ऐकले नाही व उपस्थितांशी वाद घातला. त्यामुळे उपस्थितांचा राग अनावर झाला होता व त्यातून कैलास बोराडे यांना गरम रॉडने चटके दिल्याचे चुकीचे कृत्य घडल्याचे परिसरातील नागरिक व्हायरल व्हिडीओनंतर बोलू लागले आहेत.

बोराडे, दौडकडूनही व्हिडीओबोराडे यांनी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतः एक व्हिडीओ तयार केला व आपण उबाठाचे तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांचे नाव सांगितले नाही, ते त्यावेळी तेथे नव्हते. त्यांचा काही संबंध नाही असे सांगितले. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी हा प्रकार नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. तर नवनाथ दौड यांनीसुद्धा प्रयागराज येथे परिवाराच्या सोबत दर्शनासाठी गेलेलो असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला व माझा काही संबंध नसताना राजकीय दबावापोटी पोलिसांनी मला या प्रकरणात गोवले असल्याचे सांगितले. तर त्यांची मुलगी प्रांजल दौड, पत्नी व लहान मुलगी यांनीसुद्धा आमच्या वडिलांचा प्रकरणाशी काही संबंध नाही. केवळ त्यांना राजकारणातून उठविण्यासाठी हे कटकारस्थान करण्यात आल्याचे सांगितले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व आम्हाला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.

होय, तो व्हिडीओ माझाच - कैलास बोराडेपेटत्या भट्टीतील लोखंडी सळईचे संपूर्ण अंगावर डागल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या कैलास बोराडे (रा.अन्वी, ता.भोकरदन) यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्वी येथील महादेव मंदिरात विटंबना करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शुक्रवारी व्हायरल झाला. या व्हिडीओविषयी पत्रकारांनी कैलास यांना विचारले असता, ते म्हणाले की, होय, तो व्हिडीओ त्याचाच असल्याचे त्यांनी मान्य केले, शिवाय त्याच्या अंगात महादेव आहे. दारूचे व्यसन नाही, तर प्रसाद म्हणून त्या दिवशी दारू प्यायल्याचे त्यांनी सांगितले.

देव आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांची जेलमध्ये जागाअन्वी (ता.भोकरदन) येथील महादेव मंदिरात एक जण विटंबना करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जरांगे म्हणाले की, हा व्हिडीओ मी पाहिला नाही, शिवाय त्याविषयी खात्रीने बोलता येणार नाही. मात्र, देवी, देवता असो किंवा आपल्या महापुरुषांची विटंबना करणाऱ्या अशा समाजकंटकाला तातडीने पकडून जेलमध्ये डांबायला हवे. हा व्हिडीओ त्या मोठ्या नेत्याला पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.

दौडला पुन्हा पोलिस कोठडीया प्रकरणातील आरोपी भागवत सुदाम दौड याची शुक्रवारी पोलिस कोठडी संपली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना