शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

जेलऐवजी ॲसिड लावल्याने गर्भवतीचे पोट होरपळले; कठीण परिस्थितीत मुलाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:10 IST

भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिलेवर उपचार, नातेवाईक संतप्त

भोकरदन (जि.जालना) : गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी 'अल्ट्रा साऊंड जेल' लावण्याऐवजी 'हायपोक्लोराईट' लावण्यात आल्याने गर्भवती महिलेचे पोट होरपळले. हा प्रकार भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार, २७ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.

भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास शीला संदीप भालेराव (वय २८ रा. खापरखेडा ता. भोकरदन) ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतीपूर्वी महिलेच्या गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके तपासणी करणे गरजेचे होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती तपासणी करीत असताना 'अल्ट्रा साऊंड जेल' लावण्याऐवजी 'हायपोक्लोराईट' पोटावर लावण्यात आले. त्यामुळे त्या महिलेचे पोट होरपळले आणि जखमा झाल्या. या प्रकारानंतर नातेवाईकांनी एकच रोष व्यक्त केला. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेवर उपचारही सुरू केले आहेत.

मुलाला दिला जन्मया घटनेच्या एक तासानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजता जखमी महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. महिलेचे पोट होरपळलेले असताना डॉक्टर आणि परिचारिकांनी सुखरूप प्रसूती केली. त्या महिलेची आणि बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉ. दीपक सोनी यांनी सांगितले.

लोखंडाची गंज, फरशिवरील डाग काढण्यासाठी वापरहायपोक्लोराईटचा वापर हा लोखंडाला लागलेली गंज, फरशिवरील रक्ताचे किंवा इतर डाग काढण्यासाठी केला जातो. तेच हायपोक्लोराईट पडल्याने गर्भवती महिलेचे पोट होरपळले.

रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीत्या महिलेच्या गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके तपासणीची प्रक्रिया सुरू असताना औषधीच्या ट्रेमध्ये अल्ट्रा साऊंड जेल ऐवजी हायपोक्लोराईट कोणी ठेवले? कोणाकडून महिलेच्या पोटाला ते लागले ? यात कोणाची चूक आहे ? या प्रकाराची रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

भोकरदन येथील प्रकाराची चौकशी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल.- डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Jalanaजालनाpregnant womanगर्भवती महिला