शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:50 IST

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत घुमणार शिवगर्जना; 'या' मार्गाने मार्गक्रमण करणार यात्रा.

वडीगोद्री (जालना): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान'च्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये भव्य 'शिवस्मारक यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (१४ फेब्रुवारी) महाकाळा येथून या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिवरायांचा आदर्श आपल्या आचरणात आणावा, या उदात्त हेतूने ही यात्रा काढण्यात आली आहे.

महापुरुषांच्या मूर्तींनी वेधले लक्षया यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच रथात बसवलेले सर्व महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे आणि त्यासोबतच प्रभू श्रीराम, विठ्ठल-रुक्माई व महादेवाची मूर्ती. ५१ सजवलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे असून, या अभूतपूर्व दृश्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात शिवविचारांचा प्रसार करणार आहे.

असे असेल मार्गक्रमणही यात्रा १४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातून मंठा, जिंतूरमार्गे बोरी येथे मुक्कामासाठी पोहोचेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला परभणी, हिंगोली, नांदेड; १६ फेब्रुवारीला लातूर, धाराशिव आणि १७ फेब्रुवारीला कळंब, अंबाजोगाई, परळीमार्गे माजलगाव येथे या भव्य यात्रेचा समारोप होईल.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गोंदी पोलिसांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह १०० जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी शिवभक्तांकडून या रथाचे जंगी स्वागत केले जात असून, संपूर्ण मराठवाडा सध्या भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivaji's Ideals Ride Through Marathwada: Shiv Smarak Yatra Begins!

Web Summary : A grand Shiv Smarak Yatra, celebrating Shivaji Maharaj's ideals, commenced in Marathwada with a 51-vehicle convoy. Organized by Dharmveer Chhatrapati Sambhajiraje Shaurya Pratishthan, the yatra aims to spread Shivaji's principles across eight districts, concluding in Majalgaon after traversing key cities with tight police security.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJalanaजालना