शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:50 IST

या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे.- शरद पवार

अंतरवली सराटी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दुपारी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची अंबड येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अंतरवली सराटी गावात जाऊन उपोषणस्थळी गेले. येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह जखमींची विचारपूस केली. 

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु असताना शुक्रवारी सायंकाळी पोलीस आणि आंदोलकांत वाद झाले. यातून पोलिसांनी बळाचा वापर करत आश्रुधुरचे नळकांडे फोडले,  आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांनी देखील दगडफेक केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक मोठ्याप्रमाणावर जखमी झाले आहेत. सरकार पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडीत काढत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर पहावयास दिसत आहेत. सर्वत्र पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध करण्यात येत आहे. यातच आज सकाळपासून विविध पक्षांची नेते, सानाजिक संघटना, तसेच मराठा बांधव उपोषणस्थळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पोहचत आहेत.    

दरम्यान,  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर मार्गे जालन्याकडे सकाळी रवाना झाले. प्रथम त्यांनी अंबड येथे रुग्णालयात दाखल होते जखमी आंदोलकांची चौकशी केली. त्यानंतर अंतरवली सराटी गावात उपोषणस्थळी जात मनोज जरांगी आणि इतर जखमींची भेट घेतली. आंदोलकांशी पवार यांनी यावेळी चर्चा केली. शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर केला ही दुर्दैवी घटना आहे. या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच सर्वांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण