शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण

By विजय मुंडे  | Updated: August 21, 2023 20:04 IST

जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे.

जालना : ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम असून, २७ गावे, १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत आहेत. शिवाय पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

चालू वर्षात आजवर वार्षिक सरासरीच्या ४०३.७१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, त्या तुलनेत केवळ २७६.४० मिलिमीटर पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे. आठ-दहा दिवसांनंतर पडणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपातील पिके तग धरून आहेत. परंतु, पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकीकडे खरिपातील पिकांची चिंता असताना दुसरीकडे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना २७ गावे १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत असून, त्यांच्या ९७ खेपा मंजूर आहेत. त्याशिवाय टँकरसाठी व टँकरव्यतिरिक्त गावांसाठी अशा एकूण १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आला असून, पावसाची प्रतीक्षा शेतकरी, सर्वसामान्यांना लागली आहे.

५० प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावरजालना जिल्ह्यात केवळ ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल ५० प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित १४ प्रकल्पांत केवळ ७.६५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे पाणीही एक महिनाभर पुरेल इतके आहे. यामुळे पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईची भीषणता वाढणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकटजिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात मृतसाठा आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ४४ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पात ४३ टक्के उपयुक्त पाणी आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४ टक्के, भोकरदन तालुक्यातील धामना प्रकल्पात १२ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात १६ टक्के उपयुक्त पाणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाईJalanaजालना