शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नांदेडच्या युवकाचा जालन्यात खून; तिसऱ्या दिवशी पटली मृताची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:28 IST

जालना शहरातील बसस्थानक परिसरात १० जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

जालना : शहरातील बसस्थानकाच्या परिसरात मंगळवारी १० जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. मयत व्यक्ती हा नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागात राहणारा रामेश्वर दत्तराव पवार (वय ३७) असल्याचे गुरुवारी १२ जून रोजी सायंकाळी समोर आले आहे.

जालना शहरातील बसस्थानक परिसरात १० जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोनि. संदीप भारती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. मृताच्या गळ्यात असलेला गमजा पाहता त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पंचनाम्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात संबंधित व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. त्यानुसार सदरबाजार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, पोनि. संदीप भारती व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासानंतर मयत व्यक्ती हा नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागात राहणारा रामेश्वर पवार असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून गुरुवारी सायंकाळी बोलावून घेतले. मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणचे संकलित केलेले सीसीटीव्ही फुटेज नातेवाईकांना दाखविले असून, पवार यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडJalanaजालना