शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा, आम्ही कर माफ करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:58 IST

भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ठराव

दानापूर/ पारध (जि. जालना) : जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा निर्णय भायडी, तळणी, विरेगाव (ता. भोकरदन) ग्रुप ग्रामपंचायतीने घेतला आहे. या ग्रामपंचायतीचा हा निर्णय जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीची मासिक बैठक सोमवारी सरपंच रेखा केशव जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गाव विकासातील विविध मुद्द्यांसह तिन्ही गावांतील जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी कर माफ करण्याचाही विषय होता. बैठकीत सहभागी ग्रामपंचायत सदस्य संजय पिसे, कलावती पगारे, योगिता दळवी यांनी हा विषय मांडला. उपसरपंच गंगा दसपुते, लता गायके यांनी त्यास अनुमोदन दिले. सदस्या सुनीता सोनवणे, रुख्मण बोर्डे, सांडू निकाळजे, शिवाजी जंजाळ यांनी बहुमतांनी निर्णय पारित करावा, अशी सूचना केली. त्यानुसार सरपंच रेखा जंजाळ यांनी हा ठराव पारित केल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक गजानन तायडे उपस्थित होते. दरम्यान, विरेगाव येथे पहिली ते सातवी, भायडी येथे पहिली ते सातवी व तळणी येथे पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. भायडी, तळणी आणि विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामुळे तिन्ही गावांतील जिल्हा परिषदेतील मुलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ब्राह्मणे यांच्यासह शिक्षक, पालकांनी स्वागत केले आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मुलांचे प्रवेश होत नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा मोठा आधार आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत, मुलांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. भविष्यातही शाळेतील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.- रेखा जंजाळ, सरपंच

भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने मुलांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश झाल्यानंतर पालकांना घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. इतर ग्रामपंचायतींनीही असा निर्णय घेतला तर पटसंख्या वाढून बंद पडणाऱ्या शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे.- केशव जंजाळ, शिक्षणप्रेमी

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्रgram panchayatग्राम पंचायत