लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यात ८५ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यापैकी श्रीकृष्णनगर ग्रामपंचायतीचे सर्व टप्पे रद्द करण्यात आल्याने आता ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, परिविक्षाधीन तहसीलदार शीतल बंडगर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दिलीप सोनवणे तसेच महसूल तहसीलचे कर्मचारी, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जी. एल. सुर्वे, अनिल पाटील, संदीप गाढवे, विश्वास भोरे, संदीप डोंगरे, पी. एस. रायमल, कल्याण गव्हाणे, के. के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय. आर. कुलकर्णी, के. आर. डहाळे हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करत आहेत. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करणे, अर्ज मागे घेणे, बिनविरोध ग्रामपंचायतीपर्यंतचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. या निवडणूक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तहसीलदार भुजबळ यांनी उपस्थितांची स्वाक्षरी घेत मार्गदर्शन केले.
कोट
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास चांगला असून, आपल्यावरील जबाबदारीचे सर्वांनी काळजीपूर्वक पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना
कॅप्शन : जालना येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थितांना तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अधिकारी उपस्थित होते.