शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

शोधमोहिमेत आढळले १३१ कुष्ठरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:36 AM

आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग शोधमोहिमेत जिल्ह्यात १३१ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग शोधमोहिमेत जिल्ह्यात १३१ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आता जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी कुष्ठरोग, क्षयरोग जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले असून, २३७२ शाळा व १९७५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे.केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्य सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. ही मोहीम राज्यात सर्वत्र राबविण्यात आली. या अभियानात कुष्ठरुग्णांसह क्षयरोगाचेही रुग्ण शोधण्यात आले. नव्याने शोधण्यात आलेल्या या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने याआधीही कुष्ठरुग्ण शोधले होते. जिल्ह्यात सध्या १३१ कुष्ठरूग्ण असून, या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.देशात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे. रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर या आजारांचा असंसर्गजन्य रोगात समावेश आहे. आजच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देणे तसेच या आजारांबाबत जागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. हे आजार कशाने होतात? आजार टाळण्यासाठी काय करावे? याबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून जागृती करण्यात येत असून, यासाठी ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान कृष्ठरोग व क्षयरोग जागृती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २३७२ शाळा, १९७५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून प्रभातफेरी, निबंध स्पर्धा घेऊन जागृती केली जाणार आहे. तसेच रविवारी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जागृती केली जाईल. ग्रामसभेत घोषणापत्र, प्रतिज्ञापत्राचे वाचन होणार आहे.कुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरियम लेप्री या कुष्ठजंतूमुळे होतो. कुष्ठरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी असेल तर मात्र तीन ते पाच वर्षांच्या काळानंतर शरीरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसू शकतात. शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी साधारण १० ते १५ रुग्णांपासून दुसऱ्यास कुष्ठरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कुष्ठरोगासाठी विशिष्ट वयोगट नाही, हा आजार कुणालाही होऊ शकतो. देशात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उशिराने उपचार झाल्यास कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल