शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जालन्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात; नव्या वेळापत्रकामुळे शिक्षकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:52 IST

एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जालना : जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर झालेला असून वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता शिक्षण विभागाने जिल्हयातील शाळा सोमवारपासून सकाळ सत्रात भरण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी १५ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरवल्या जात असत. मात्र यावर्षी भीषण दुष्काळीस्थिती, पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात पत्राच्या शाळा यामूळे बीड, औरंगाबाबाद, बुलढाणा, लातूर सह मराठवाड्यात सर्वत्र १ मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळ सत्रात भरण्याचे आदेश सरकारने   शिक्षण विभागाना दिले आहे. मात्र जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या आदेशाचे पालन केले नव्हते.  विदयार्थ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती पाहता व भौतिक सुविधांचा असलेल्या अभावामुळे जालना जिल्हयात देखिल शाळा सकाळाच्या सत्रात भरण्याची मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती.

या मागणीची दखल घेत  शिक्षण विभागाने सकाळच्या  सत्रात शाळा भरण्याबाबत आदेश काढले आहेत.  परंतु, शाळेच्या वेळेमुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  सकाळी ७.३० ते दुपारी १ असा वेळ असल्याने शिक्षकामध्ये कमालीची नाराजी वाढली आहे. दुपारी १ नंतर विदयार्थ्यांना घरी जातांना उन्हाच्या झळा लागतील, शिवाय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अपडाऊन करणाऱ्या पायी व सायकलीवरील विद्यार्थ्याना याचा त्रास होणार आहे. बीड, लातुर, औरंगाबाद, बुलढाणा या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये १२ वाजेपर्यत शाळा भरत आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक