शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील शाळा वनराईने नटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:49 IST

जिल्ह्यातील ५८ शाळा वनराईने नटणार आहेत. याला प्रशासनाने ‘डेस फॉरेस्ट’ असे नाव दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात झाडांचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जि.प.च्या ११५ शाळांमध्ये ‘माझी शाळा माझी रोपवाटिका’ ही योजना राबविली. आता ही रोपे मोठी झाली असून, जिल्ह्यातील ५८ शाळा वनराईने नटणार आहेत. याला प्रशासनाने ‘डेस फॉरेस्ट’ असे नाव दिले आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. त्यामुळे सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. वृक्षलागवडीसाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, वृक्ष लागवडीनंतर याकडे लक्ष न दिल्याने ही रोपे जळून जात आहेत. यामुळे हे प्रयत्नही असफल होताना दिसत आहेत.जिल्ह्यात झाडांचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ११५ शाळांमध्ये ‘माझी शाळा माझी रोपवाटिका’ हा उपक्रम राबविण्यात आला. रोपवाटिकेमध्ये रोपे लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी या रोपवाटिकांचा सांभाळ केला असून, या रोपवाटिकेतील रोपे मोठी झाली आहेत. आता जि.प. प्रशासनाच्या वतीने जि. प. च्या ५८ शाळांमध्ये डेस फॉरेस्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असून, हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ११५ शाळांमध्ये तयार केली २ लाख ३० हजार रोपे माझी शाळा माझी रोपवाटिका या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ११५ शाळांमधून तब्बल २ लाख ३० हजार रोपे तयार केली आहेत. या रोपांची लवकरच लागवड करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदenvironmentपर्यावरणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा