शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परतूरचा १ कोटी १० लाखांचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:04 IST

तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.

ठळक मुद्देउपाययोजना : यंदा पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार

शेषराव वायाळ/परतूर : तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.परतूर तालुक्यात यावर्षी झपाट्याने पाणी पातळी खालावत आहे. दररोज बोअर व विहरिंचे पाणी हाबकत आहे. मागील वर्षी केवळ पाच गावांतील विहिरींचे अधिग्रहण करणाऱ्या तालुक्याने यावर्षी १ कोटी ९ लाख ८० हजारांचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये नवीन विहीर घेणे १४ लाख ४० हजार, विंधन विहीर विशेष दुरुस्ती २ लाख १० हजार, नळ योजना विशेष दुरूस्ती ६ लाख, खाजगी विहीर अधिग्रहण करणे ३० लाख ६० हजार रूपये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ५६ लाख ७० हजार रूपये असे एकूण १ कोटी ९ लाख ८० हजार रूपयांचा खर्च ग्रामीण भागातील टंचाई ग्रस्त गावात अपेक्षित आहे. मागील वर्षी पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता एवढी नव्हती केवळ पाच गावात विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते. यासाठी ९० हजार रूपये खर्च झाला होता. तोच खर्च यावर्षी दहा पटीपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. पाणी पातळी लवकरच खालावल्याने काही गावात पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी साठा सद्या पन्नास टक्क्यांवर आला आहे. या धरणावर यावर्षी परतूर, सेलूसह नव्याने परभणी व पुर्णा शहराचीही तहान भागविण्याची जबाबदारी आहे. याच वर्षी परभणी व पुर्णेसाठी या धरणातून आतापर्यंत दोन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे निम्न दुधनाच्या बॅक वॉटर मध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या धरणाच्या उपशावरही निर्बंध आणावे लागतील. एकूणच या वर्षी पंचायत समितीने सादर के लेल्या पाणी टंचाई कृती आराखडयावरून ग्रामिण भागात पाणी प्रश्न गंभिर होण्याची चिन्ह दिसत आहेत.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र