शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मामा-काका वाचवा! पप्पा अन् भाऊ बुडताहेत; चिमुरड्यांचा मदतीसाठी टाहो, पण सारे व्यर्थ ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:07 IST

वडिलांसह तिन्ही मुले अंघोळ करण्यासाठी मोती तलावात आले होते.

- दीपक ढोलेजालना : पोहण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील मोती तलावात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. माणिक बापूराव निर्वळ (३८), आकाश माणिक निर्वळ (१४, दोघे रा. चंदनझिरा, मूळ गाव धर्मापुरी, परभणी) अशी मयतांची नावे आहेत. वडील व भाऊ पाण्यात बुडल्याचे पाहताच सोबत आलेल्या दोन्ही भावडांनी घराकडे धाव घेतली. धावत धावत घर गाठले. धापा टाकत टाकत ते म्हणाले, दादा... दादा, पप्पा अन् भाऊ पाण्यात बुडताहेत, लवकर चला त्यांना वाचवायला. असे म्हणताच नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

माणिक निर्वळ हे परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी येथील रहिवासी आहे. हाताला काम नसल्याने ते काही वर्षांपूर्वी पत्नी व तीन महिलांसह शहरातील एमआयडीसी परिसरात आले. एका कंपनीत काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी मंठा येथील नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी ते गेले होते. मंगळवारी दुपारी ते घरी आले. चार वाजेच्या सुमारास वडिलांसह तिन्ही मुले अंघोळ करण्यासाठी मोती तलावात आले. माणिक निर्वळ व आकाशला थोडेफार पोहणे येत होते, तर रोहित व विकीला पोहता येत नसल्याने ते तलावाच्या काठावरच थांबले. आकाश पोहत पोहत पुढे गेला. तेवढ्यात त्याचा पाय खड्ड्यात पडला. तो बुडत असतांनाच वडील त्याला वाचविण्यासाठी गेले. परंतु आकाशने वडिलांना मिठी मारली. नंतर दोघेही पाण्यात बुडाले.

आपले वडील व भाऊ पाण्यात बुडतांना पाहताच रोहित व विकीने घराकडे धाव घेतली. धावत धावत अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले घर गाठले. धापा टाकत टाकत ते म्हणाले, दादा... दादा, पप्पा अन् भाऊ पाण्यात बुडताहेत, लवकर चला त्यांना वाचवायला. असे म्हणताच नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमक दलाच्या जवानांना बोलावून मृतदेह बाहेर काढले. बहिणींनी भावाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. पोलिसांनी नातेवाइकांना बाजूला करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना