शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

लोकवर्गणीतून बदलले सावंगी जि.प. शाळेचे रुपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:07 IST

शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे.

ठळक मुद्देशाळेची इमारत बनली जणू रेल्वे : प्रत्येक खोली रेल्वेचा डबा, ग्रामस्थ व शिक्षकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे.सावंगी हे दिड ते दोन हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ५ पर्यंतची शाळा आहे. यावर्षी झालेल्या शिक्षकांच्या बदल्यात शाळेत काही नवीन शिक्षक बदलून आले. यात शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार उपक्रमशील शिक्षक रमेश साळवे यांच्याकडे आला. त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेच्या रंगरंगोटी चा मनोदय बोलून दाखविला. यासाठी समितीने सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवून लोकवर्गणी जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. बघता बघता आठ दिवसांत शिक्षक व ग्रामस्थांनी मिळून ४१ हजार एवढा निधी उभा केला.या लोकवर्गणीतून आज सावंगी शाळेचे आंतरबाह्य रुप बदलले आहे. शाळेचे रूपडे एका रेल्वेच्या रुपात पालटले आहे. शाळेच्या खोल्यांंना रेल्वे प्रमाणे सजविण्यात आले असल्याने प्रत्येक वर्ग जणू रेल्वेचा एक डबा दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही हुरूप वाढला आहे. केवळ १५ दिवसांत रंगरंगोटी ने नटलेली ही शाळा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.शाळेच्या या रंगरंगोटीसाठी सावंगीच्या सरपंच स्वाती वरगणे, उपसरपंच सत्यभामा वरगणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी वरगणे, उपाध्यक्ष सुरेश राऊत, मुख्याध्यापक रमेश साळवे, शिक्षक अनिल वाघ, लता सपकाळ, ज्योती धनवई, ग्रामसेविका माधुरी अवचार, किशोर वरगणे, दीपक वरगणे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Jalanaजालनाzp schoolजिल्हा परिषद शाळा