शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:09 IST

धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट

वडीगोद्री ( जालना) : ''तुम्ही कोणालाच सोडू नका. मराठा समाज न्यायासाठी डोळे लावून बसला आहे'', असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मीक कराड यांच्या सरेंडरनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. सरपंच देशमुख यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ते दहशती खाली आहेत. त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे यांनी केला.

मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटी नंतर मनोज जरांगे पाटील व धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, न्याय देण्याचे काम फडणवीस साहेबांनी करावे. सर्व आरोपी धरावे, सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. वाल्मीक कराड दोन महिन्यापासून कोणाकोणाशी बोलला. कोणत्या मंत्र्याशी बोलला, त्याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, त्या सर्व लोकांना आत टाकलं पाहिजे. सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल करू नये, यातील एकही माणूस सुटू नये, यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारनी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांनी केली.

वाल्मीक कराड कसं ठरवल आरोपी नाहीत म्हणून, न्यायदेवता ठरवल : धनंजय देशमुख सरकारने वाल्मीक कराड सोबतचे सर्व आरोपी शोधावे. सीडीआर काढून जे कोणी दोषी असेल त्यांना ताब्यात घ्यावे. सरकारने लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा. वाल्मीक कराड खुनाच्या प्रकरणात आरोपी नाहीत हे कसे ठरवले, असा सवाल जरांगे यांनी केले. न्यायदेवता ठरवल आरोपी कोण आहे ते, सत्य समोर येणार थोडा वेळ जाईल, सीआयडीचा प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे आज आरोपी जेरबंद झाला अशी प्रतिक्रीया धनंजय देशमुख, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी दिली ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटीत आले होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणJalanaजालना