शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:42 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार चद्रकांत दानवे यांचा सलग तिसऱ्यांदा झाला पराभव

भोकरदन ( जालना):भोकरदन विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार संतोष रावसाहेब दानवे यांनी २३,१७९ मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चद्रकांत दानवे यांचा तिसऱ्यांदा पराभव केला आहे.

भोकरदन मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार आखाड्यात होते. यात संतोष दानवे आणि चद्रकांत दानवे यांच्यात लढत झाली आहे. संतोष दानवे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते ते कायम आघाडीवरच राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यामुळे आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा आत्मविश्वास असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा २३,१७९ मतांनी पराभव झाला असून, त्यांना १,०५,३०१ एवढी मते पडली आहे.

या भोकरदन मतदारसंघात १९ अपक्ष उमेदवार होते. त्यामुळे मतांचे अधिक विभाजन होईल, असे वाटले होते. परंतु, या अपक्षाचा निवडणुकीवर फारसा काही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.

विजयाची तीन कारणे१) भोकरदन मतदारसंघात संतोष दानवे यांनी आमदार असताना विविध विकासकामे केली असून, त्यांची आर्थिक बाजूही बळकट आहे.२)लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे नियोजनबद्ध प्रचार करण्यावर भर दिला होता.३) महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाला.

दानवेंच्या पराभवाची कारणे...महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला असून, त्याची विविध कारणे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ दिसून आला नाही. तसेच, आपणच विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास नडला. मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार करण्यात अपयशी ठरले आहेत.

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते: चंद्रकांत पुंडलिकराव दानवे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी रदचंद्र पवार १,०५,३०१संतोष रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टी १,२८,४८०राहुल जालिंदर छडीदार बहुजन समाज पार्टी ८७०अंजली सांडू भुमे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक १२०गजानन सीताराम बर्डे भारतीय ट्रायबल पार्टी ३५१डिंगाबर बापूराव कऱ्हाळे भारतीय वीर किसान पार्टी १६७दीपक भीमराव बोऱ्हाडे वंचित बहुजन आघाडी २०३१मयूर रामेश्वर बोर्डे स्वाभिमानी पक्ष ४९३विकास विजय जाधव महाराष्ट्र स्वराज्य पार्टी ५२८ॲड. साहेबराव माधवराव पंडित हिंदुस्तान जनता पार्टी ३५७ॲॅड. फकिरा हरी सिरसाठ पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ९८सुनील गिनाजी इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक १०८सुनील लक्ष्मणराव वाकेकर विदुथलाई चिरुथईगल काटची १०५अकबरअली अक्रमअली खान अपक्ष १३३कडूबा म्हातारबा इंगळे अपक्ष ५८८केशव आनंदराव जंजाळ अपक्ष ३६९९केशव रामकिसन देठे अपक्ष १५४४कैलास रामदास पाजगे अपक्ष १११५गणेश रतन साबळे अपक्ष १८९चंद्रशेखर उत्तमराव दानवे अपक्ष १०३जगदीश दिलीप राऊत अपक्ष ७३जगन तुकाराम लोखंडे अपक्ष ३९दिवाकर कुंडलिक गायकवाड अपक्ष ६८नासेर दाऊद शेख अपक्ष १२७निलेश बळीराम लाठे अपक्ष १६१महादू लक्ष्मण सुरडकर अपक्ष १५२यासीन सलीम मदार अपक्ष ७१योगेश पाटील शिंदे अपक्ष ६९रफीक अब्बास शेख अपक्ष ९०रवी विजयकुमार हिवाळे अपक्ष १८९वैशाली सुरेश दाभाडे अपक्ष २३७०शिवाजी आत्माराम भिसे अपक्ष ५१९

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदन