शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतुकीचे दोन टेम्पो पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:50 IST

पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली नाही.

ठळक मुद्देआरोपी मोकाट : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

तळणी : पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली नाही.उस्वद- देवठाणा व टाकळखोपा येथून दिवसरात्र अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु असल्याच्या माहीतीवरुन अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने उस्वद- देवठाणा रोडवर अवैधरित्या एक ब्रास वाळुची चोरटी वाहतूक करणारे टेम्पो (एम. एच. २१-बी.एच. ४८०) व .(एम. एच. २८-एबी-५०२३) हे असून सुधाकर माधवराव सरोदे व महादेव उध्दव सरोदे (दोघे रा. उस्वद, ता. मंठा ) यांच्याविरुध्द गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकात विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखोरे, ए. एस. राजपुत, दीपक आढे यांचा समावेश होता.सदर टेम्पोवर कारवाई न करता सोडून द्यावे, यासाठी पत्रकारांसमोर पथकातील पोलिसांसोबत तडजोडीची भाषा करण्याची वाळू माफियांमध्ये हिंमत येते कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना परिसरात घडल्या आहेत.बेसुमार वाळू उपसामुळे पाणी टंचाईपूर्णा नदीपात्रातून उस्वद- देवठाणा, टाकळखोपा, कानडी, सासखेडा, वाघाळा, पोखरी केंधळे, भूवन येथून दिवसरात्र अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतूक सुरु आहे. या अवैध वाळू चोरीमुळे नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्षपूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळुची चोरी सुरू असून, या संदर्भात अनेक तक्रारीनंतरही मंठा महसूल व पोलीस प्रशासनकडून अद्यापही कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग