शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

परतूर तालुक्यात वाळूचा उपसा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:58 IST

दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून, यामुळे नदी पात्राची चाळणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर: तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून, यामुळे नदी पात्राची चाळणी झाली आहे. यामुळे पात्राची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता घटली असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.परतूर तालुक्याला गोदावरी व दुधना या नद्यांचे पात्र लाभले आहे. या दोन्ही नदीच्या पात्रातून सातत्याने वाळू उपसा होत असतो. या पात्रातील वाळू घाटाचे लिलाव दरवर्षी लांबणीवर पडतात. याचा लिलाव हो या ना हो मात्र, वाळू उपसा सुरुच असतो. या पात्रातील वाळू मराठवाड्यात जाते. मागील काही दिवसांपासून निम्न दुधनाचे बॅक वॉटर खाली गेल्याने वडगाव वाळपट्टा उघडा पडला आहे. या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ‘फ्रेश’ वाळूचे घबाड या माफियांना सापडले आहे.वडगाव पट्ट्याजवळ परतूर शहराला चाळीस वर्षापासून पाणीपुरवठा करणारी योजना होती. पाडळी येथून शुध्द पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. यावर्षी अल्प पावसाने धरणातील पाणी पातळी फारशी वाढली नाही. व आहे ते पाणी झपाट्याने घटू लागले आहे. मागील दोन महिन्यापासून बॅक वॉटर खाली गेल्याने वडगाव पाणीपुरवठा योजनेजवळील वाळू पट्टा पुर्ण उघडा पडला आहे. याचा फायदा घेऊन येथे दररोज मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर वापरले जात असून, रात्र दिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे.या वाहनांना जाण्यासाठी वाळू माफियांनी रक्कम खर्च करुन जेसीबीने रस्ता तयार केला आहे. या बेसूमार वाळू उपशामुळे दुधना नदीच्या पात्राची पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटली आहे.रात्रभर ही वाहने धडधड करीत सुसाट वेगाने धावत असल्याने या मार्गावरील रहिवाशांची झोपही उडाली आहे. याबरोबरच वाहनांमुळे रोडवरील खडी पूर्णपणे उघडी पडून रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. तरी या वाळू पट्ट्याचा रीतसर लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी