शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांची मुजोरी, बदनापूरमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:02 IST

घोटण गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

बदनापूर ( जालना): तालुक्यातील घोटण गावात बदनापूरचे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना मारहाण करून महसूल पथकाने पकडलेले ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत नायब तहसीलदार हेमंत तायडे म्हणाले की, काकासाहेब जाधव, योगेश वनारसे व अन्य एक कर्मचाऱ्यांचे महसूल पथक आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घोटण शिवारातील दुधना नदी पात्रात आले होते.  त्यावेळी नदीपात्रात एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले. पथकाने थांबण्यास सांगितले असता चालक ट्रॅक्टर घेऊन तेथून भरधाव वेगात निघाला. नायब तहसीलदार हेमंत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. घोटण गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर अडविण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला. दरम्यान, नायब तहसीलदार हेमंत तायडे हे पथकासह ट्रॅक्टरजवळ उभे असताना दहा ते पंधरा जणांचा जमाव तेथे आला. त्यांनी नायब तहसीलदार तायडे आणि महसूल पथकावर हल्ला केला. नायब तहसीलदार तायडे मारहाण करत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळून नेले. 

दरम्यान, याबाबत बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी दिली आहे.

टॅग्स :JalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू