शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणानंतरच वाळूचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:10 IST

राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाळू आणि खडी टंचाईमूळे बांधकाम व्यवसाय धोक्यात आला आहे. वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केल्याने आता भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या नद्यांमधून वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा वाळू घाटांचे खाजगी एजंन्सीकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्वेक्षण एजन्सी कोणत्या वाळू घाटांमधून किती वाळू उपसावी याचे विवरण गौण खनिज विभागाला देईल. त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू तसेच खडीची टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठल्याने विभागीय आयुक्तांनी या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्या नंतर अवैध वाळू उपसा आणि त्याच्या वाहतुकीवर बराच फरक पडला आहे. असे असले तरी वाळू माफियांकडून सद्यस्थितीत अधिकारी तसेच पोलिसांना हाताशी धरून चढ्या भावाने वाळूचे ट्रक, टिप्पर विक्री होत आहे. सध्या शासनाकडून पर्यावरण संवर्धनाला मोठे महत्व दिले जात आहे. त्यामूळे अवैध वाळू उत्खननावर बारीक लक्ष असून, ते जो पर्यंत संपूर्ण वाळू घाटांचे लिलाव होणार नाहीत, तो पर्यंत असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवैध उत्खनन व वाहतुकीची २३१ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत संबंधितांना ४ कोटी ८५ लाख १० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, १ कोटी ४४ लाख ३४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात जालना तालुक्यात १७ कारवाया करून ३३ लाख ५६ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी २१ लाख ९९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बदनापूर केलेल्या १३ कारवायांमध्ये २४ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, ९ लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. भोकरदन २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात ४५ लाख ६३ हजाराचा दंड आकारण्यात आला असून, यातील १८ लाख २१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.५६ प्रकरणांत गुन्हे दाखलवाळू उत्खनन, वाहतूक प्रकरणात जिल्ह्यात ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यात २, भोकरदन तालुक्यात ३, जाफराबाद तालुक्यात ५, परतूर तालुक्यात २, मंठा तालुक्यात १, अंबड तालुक्यात ३६ तर घनसावंगी तालुक्यातील ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१०५ वाहने जप्तजिल्हा खनिकर्म अधिकारी विभागाने केलेल्या कारवाईत आजवर १०५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. यात परतूर तालुक्यात १८, अंबड तालुक्यात ८७ असे एकूण १०५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.पथकावरही झाला हल्लाअवैध वाळू तस्करांविरूध्द प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यात कारवाईवेळी जाफराबाद तालुक्यात एका पथकावर हल्ला झाला आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागSmugglingतस्करी