शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य सेवाच ‘आजारी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 00:38 IST

गावस्तरावरील महत्त्वाचा घटक असलेल्या या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) पदे रिक्त आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील १४६ महसुली गावांसह वाड्या, तांड्यावरील अडीच लाखावर नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. मात्र, गावस्तरावरील महत्त्वाचा घटक असलेल्या या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) पदे रिक्त आहेत. डॉक्टरांसह इतर जवळपास ३३ पदे रिक्त असून, रिक्त पदांमुळे जालना तालुक्यातील ग्रामीण भागाची आरोग्य सेवा कोलमडली आहे.जालना तालुक्यात जवळपास १४६ महसुली गावे असून, वाड्या, तांड्यांची संख्या वेगळी आहे. अडीच लाखांवर नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सहा आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाºयांची पदे मंजूर आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. तर एमपीडब्ल्यूची दोन, लिपिक एक, एएनएम एक, आरोग्य सेविकेचे एक व सेवकाचे एक अशी आठ पदे रिक्त आहेत. मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक, एमपीडब्ल्यूच्या तीन, एएनएम दोन, आरोग्य सेविकेचे एक, सेवकाचे एक अशी आठ पदे रिक्त आहेत. कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे एक, एएनएमची दोन व सेवकाचे एक पद रिक्त आहे. विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक, एमपीडब्ल्यूची दोन, एएनएमचे एक, सेवकाची तीन पदे रिक्त आहेत. पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकाचे एक, सेवकाची दोन पदे रिक्त आहेत. तर काळेगाव (दु.) प्राथमिक आरोग्य केंद्रातील एएनएमचे एक, एमपीडब्ल्यूचे एक व सेवकाचे एक असे एकूण सात पदे रिक्त आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा रूग्ण सेवेवर परिणाम होत आहे. विशेषत: सेवली येथे कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्त नाही. प्रभारीवर कामकाज सुरू आहे. इतर ठिकाणी एकाच वैद्यकीय अधिका-याच्या खांद्यावर कामकाजाचा भार पडला आहे. त्यांनाच शासकीय बैठका, दौरे, आरोग्य उपक्रम राबवावे लागतात. त्यामुळे रूग्णांना सेवा देताना या अधिका-यांना कसरत करावी लागते. प्रसंगी इतर कर्मचा-यांकडूनच प्रथमोपचार घेऊन रूग्णांना घरी परतावे लागत आहे. अनेक रूग्ण थेट जालना येथील शासकीय किंवा खाजगी रूग्णालय गाठत आहेत. त्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालय जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या एका धोकादायक इमारतीत सुरू आहे. याच इमारतीत आरोग्य विभागाची इतर कार्यालयेही आहेत.मात्र, या इमारतीची अवस्था पाहता तातडीने या इमारतीतील सर्वच कार्यालये सुव्यवस्थेतील इमारतीत न्यावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य