शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चादरीची केली दोरी, जेलची २२ फुटांची भिंत ओलांडली; बलात्काराच्या गुन्ह्यातील कैदी फरार

By दिपक ढोले  | Updated: September 18, 2023 17:05 IST

जालन्यातील कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

जालना : चादर, दोरीच्या साह्याने २२ फुटांची संरक्षण भिंत ओलांडून कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील इंदेवाडी शिवारातील जिल्हा कारागृहात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. तुळशीराम मुरलीधर काळे (रा. बाजार गल्ली, आष्टी) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तुळशीराम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कारखाना विभागातील १८ कैद्यांना नेहमीप्रमाणे स्वयंपाकगृहाच्या विभागात कारागृह शिपाई पो.काॅ. रामआप्पा परळकर हे घेऊन गेले होते. स्वयंपाकगृहात गेल्यानंतर कैद्यांची मोजणी केली असता, त्यात एक कैदी दिसून आला नाही. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली व त्यांनी शोधाशोध सुरू केली. 

कैदी तुळशीराम काळे हा असल्याची खात्री पटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आधी कारागृहात सर्वत्र त्याला शोधले. तुळशीराम यास अंगावर घेण्यासाठी देण्यात आलेली एक चादर व दोरी एकमेकांना बांधून ती कारागृहाच्या भिंतीच्या तटाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. चादर व दोरीच्या साह्यानेच भिंतीवर चढून तो पळून गेल्याची खात्री कारागृह प्रशासनास झाली. त्यानंतर पो.काॅ. रामअप्पा परळकर यांच्या फिर्यादीवरून संशयित कैदी तुळशीराम काळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या २२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कारागृह प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणलेला कैदीही पळून गेल्याची घटना घडली होती.

डीवायएसपींची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सपोनि अंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही असतांना कैदी कसा पळाला ?जिल्हा कारागृहात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. असे असतांनाही कैदी चादर व दोरी बांधून पळाला आहे. याकडे कारागृह प्रशासनाचे लक्ष कसे केले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तुळशीराम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी