लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ खरात येथील पोलीस पाटलाच्याच घरावर धाडसी दरोडा पडला. ही घटना शनिवारी पहाटे घडली असून, दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, दागिन्यांसह २ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ खरात येथील पोलीस पाटील संपतराव सुंदर खरात हे शुक्रवारी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. समोरच्या खोलीत संपतराव खरात, त्यांची पत्नी व नात मनस्वी खरात हे झोपलेले होते. तर पाठीमागच्या खोलीत त्यांचा मुलगा व सून होते. घरात येणारा आवाज ऐकू येतात संपतराव खरात जागे झाले. त्याचवेळी घरात आठ दरोडेखोर शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलीस पाटलाच्या घरावर जबरी दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:42 IST